esakal | नातेवाईकाला भेटण्यासाठी आले अन् ‘कोरोना’ पॉझिटिव्ह निघाले... 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

विदर्भातील धानोरा येथील ६४ वर्षीय इसम उमरखेड येथून (ता.सहा) जीपने धनोडा फाटा येथे आला व तेथून माहूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मालवाडा या गावी आपल्या नातेवाईकाकडे आला. गुरुवारी (ता.सात) सकाळी पावने अकरा वाजता घशाचा त्रास, पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात आला त्यास तत्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यात आले. यानंतर त्याचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे.   

नातेवाईकाला भेटण्यासाठी आले अन् ‘कोरोना’ पॉझिटिव्ह निघाले... 

sakal_logo
By
बालाजी कोंढे

माहूर ः माहूर येथून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मालवाडा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या ६४ वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाल्याची माहिती तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर व वैद्यकीय अधिक्षक डॉ.व्ही.एन.भोसले यांनी शनिवारी (ता.नऊ) सायंकाळी दिली.

विदर्भातील धानोरा येथील ६४ वर्षीय इसम उमरखेड येथून (ता.सहा) जीपने धनोडा फाटा येथे आला व तेथून माहूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मालवाडा या गावी आपल्या नातेवाईकाकडे आला. गुरुवारी (ता.सात) सकाळी पावने अकरा वाजता घशाचा त्रास, पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात आला त्यास तत्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यात आले. शुक्रवारी (ता.आठ) त्याचा स्वॅब घेण्यात येवून नांदेडला पाठविण्यात आला. शनिवारी (ता.नऊ) त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर व वैद्यकीय अधिक्षक डॉ.व्ही.एन.भोसले यांनी शनिवारी सायंकाळी दिली. तसा अहवाल शनिवारी (ता.नऊ) सायंकाळी प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली.

हेही वाचा - विजेच्या कडाकडाटाने उडाली झोप, कुठे ते वाचा...

कंटेटमेंट प्लॅनसाठी तातडीची बैठक 
शनिवारी (ता.नऊ) सायंकाळी पाच वाजता अहवाल येताच माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात कंटेटमेंट प्लॅन रणनितीसाठी तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीस तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.व्ही.एन.भोसले, गटविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.बी.भिसे, पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख, सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, डॉ. किरणकुमार वाघमारे, डॉ. निरंजन केशवे, ग्रामसेवक विनोद जाधव उपस्थित होते. सदरिल बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

हेही वाचा - उद्योजकाने घरातच बांधली रेशीमगाठ... 

नांदेडला शनिवारी दिवसभरात सात बाधित, एकाचा मृत्यू
नांदेड ः शहरात शनिवारी (ता.नऊ) सकाळी मिळालेल्या अहवालात नगिनाघाट परिसरातील दोघांना तर सायंकाळी सातच्या अहवालात चार, तर आठ वाजताच्या अहवालात एकाला, अशा सात जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. दरम्यान, आठ वाजता आलेल्या अहवालातील व्यक्तीचा मृत्यू शनिवारी पहाटे झाला होता. मात्र, मृत्यूनंतर मयताचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. यामुळे जिल्ह्यातील बाधीतांची संख्या आता ४५ वर गेली आहे.

एका दिवसात तीन अहवाल
होळीला- जम्मू काश्मीर येथून नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या मात्र, दीड महिन्यापासून येथेच असलेल्या दोन यात्रेकरूंना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. सायंकाळच्या अहवालात शहरातील तीन रुग्ण बाधित असून यात दोन १४ वर्षीय मुलांसह ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्याशिवाय माहूर तालुक्यातील ६४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील तिन्ही रुग्ण हे देगलुरनाका भागातील रहेमतनगरमध्ये मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, नगिनाघाट परिसर व रहेमतनगर परिसरातील ६३ जणांचे स्वॅब शुक्रवारी (ता.आठ) तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी ५४ जणांचा अहवाल शनिवारी सकाळी मिळाला. यात जम्मू काश्‍मीरचे दोघेजण पॉझिटिव्ह सापडले. त्यामध्ये ५५ व ५७ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. 

पहाटे मृत्यू तर रात्री पॉझिटिव्ह अहवाल
शहरातील करबला भागातील ६१ वर्षीय संशयित रुग्णास शुक्रवारी (ता.आठ) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी पहाटे साडेचार वाजता संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. या वेळी या रुग्णाचा थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असता सदर रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शनिवारी रात्री आठ वाजता प्राप्त झाला.