esakal | अर्धापूर, भोकर, मुदखेड तालुक्यातील उमेदवार निवडीचे अधिकारी अशोक चव्हाणांना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणूक..

अर्धापूर, भोकर, मुदखेड तालुक्यातील उमेदवार निवडीचे अधिकारी अशोक चव्हाणांना

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी निवडणुकीची जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, मुदखेड, भोकर या तिन्ही तालुक्यातील उमेदवार निवडीचे सर्व अधिकार पालकमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या पसंतीने उमेदवार ठरणार आसल्यामुळे लाॅबींग सुरू झाली आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेल्या मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. यात जिल्हा सहकारी बॅंकेचा समावेश आहे. काही जिल्ह्यात या निवडणुका घेण्यात आल्या असून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.

हेही वाचा - जागतिक मराठी भाषा दिन विशेष : जागतिकीकरणात मराठी भाषा

जिल्ह्यातील सोळा तालुक्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कार्यक्षेत्र असून 21 संचालक निवडून देण्यात येणार आहेत. सोसायटी मतदार संघातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे सोळा संचालक निवडले जातील. यात नांदेड व हिमायतनगर या दोन तालूक्यातून महिला संचालक निवडल्या जातील .तसेच अनुसुचित जाती, जमाती प्रवर्ग, इतर मागासवर्ग प्रवर्ग, भटके विमुक्त प्रवर्ग, नागरी सहकारी बॅंक, सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था व ईतर सहकारी संस्था गटातून प्रत्येकी एक असे 21 संचालकांसाठी निवडणूक होईल.

भोकर विधान सभा मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील काॅग्रेसच्या समर्थक मतदारांची व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक नांदेड येथे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता. 26) झाली. या बैठकीत उमेदवार निवडी विषयी चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या मतदार,पदाधिकारी, उत्सुक उमेदवारांनी या तिन्ही तालुक्यातील उमेदवार निवडीचे अधिकार पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दिले आहेत. गेल्या निवडणुकीत या तिन्ही तालुक्यातून काॅग्रेसचे संचालक निवडून आले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image