esakal | अनाथाश्रमातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार; अधीक्षक शिवाजी गुंठे यास अटक

बोलून बातमी शोधा

A case has been registered against the director of an orphanage in Mudkhed for torturing minor girls}

या अनाथ आश्रमातून शनिवारी (ता.२७) रोजी रात्री दोन मुली अचानक बेपत्ता झाल्याची फिर्याद अनाथ आश्रमाचे चालक अधिक्षक शिवाजी कोंडीबा गुंठे यांनी मुदखेड पोलिसात दिली होती.

अनाथाश्रमातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार; अधीक्षक शिवाजी गुंठे यास अटक
sakal_logo
By
गंगाधार डांगे

मुदखेड (नांदेड) : मुदखेड येथे कार्यान्वित असलेल्या आस्था अनाथ बालकाश्रमातील संस्थाचालक अधीक्षकानेच या अनाथ मुलींवरती सतत अत्याचार केल्याप्रकरणी मुदखेड पोलिसात गुन्हा दाखल झाला. या नराधमास मुदखेड पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे.

मुदखेड येथे पाटबंधारे वसाहतीच्या पाठीमागे खंडोबा माळाच्या पायथ्याशी असलेल्या खासगी संस्थेच्या माध्यमातून आस्था अनाथ बालकाश्रम चालवले जाते. या अनाथ आश्रमामध्ये दोन वर्षापासून ते सतरा वर्षापर्यंतच्या अनाथ मुली व मुले वास्तव्यास आहेत. या अनाथ आश्रमातून शनिवारी (ता.२७) रोजी रात्री दोन मुली अचानक बेपत्ता झाल्याची फिर्याद अनाथ आश्रमाचे चालक अधिक्षक शिवाजी कोंडीबा गुंठे यांनी मुदखेड पोलिसात दिली होती.

माहूर तालुक्यातील आष्टा आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड

या अनाथ बालकाश्रमातील दोन मुली (ता. २७) च्या रात्री मुदखेड येथून कृष्णा एक्सप्रेस या रेल्वे गाडीने निघून गेल्या व या मुली किनवट येथील रेल्वे स्थानकावर उतरल्याने किनवट रेल्वे पोलिसांनी त्यांना रात्रीच्या वेळेस एकटे पाहून ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्या मुली मुदखेड येथील अनाथ बालकाश्रमातील असल्याचे समजले. त्यावेळी संबंधित रेल्वे पोलिसांनी मुदखेड पोलिसांशी संपर्क केला असता मुदखेड पोलीसांनी किनवट येथे जाऊन सदरील दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

यावेळी या मुली संबंधित अनाथाश्रमात जाण्यास नकार देत होत्या. या अनाथाश्रमात या मुली का जात नाहीत व का राहण्यास तयार नाहीत याची मुदखेडचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी चौकशी केली असता त्यांच्यापुढे या मुलींवरती अनाथ आश्रम चालवणाऱ्या अधिक्षकाकडूनच अत्याचार होत असल्याचे समोर आले. यावरून मुदखेड पोलिसांनी सदरील अनाथ मुलींची मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून या मुलींच्या जबाबावरून अनाथ बालकाश्रम चालक अधिक्षकच त्याच्यावर अत्याचार करीत असल्याचे समोर आले.

अल्पवयीन अनाथ मुलीवर अत्याचार करणारा नराधम शिवाजी कोंडीबा गुंठे (रा.मुदखेड) याच्याविरुद्ध अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून रविवारी सकाळी आरोपीस अटक करण्यात आली. त्यानंतर मुदखेड पोलिसांनी संबंधित नराधम आरोपीस नांदेड येथील न्यायालयापुढे हजर केले असल्याची माहिती मुदखेडचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा व पोलीस उपनिरीक्षक राजू वटाणे हे करीत आहेत.