nanded
nandedSakal

Nanded News : शहरात अवैधरित्या दारू विक्रीचे गुन्हे दाखल

मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना अटक : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नांदेड नांदेड येथील नमस्कार चौक परिसरातील हॉटेल, खानावळ व ढाब्यावर परवाना नसतांना दारूची विक्री केल्याप्रकरणी छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.

nanded
Nanded News : हरभऱ्यावरील किडीचे व्यवस्थापन आवश्यक

नमस्कार चौक येथील रानाजी हॉटेल, राजवाडा ढाबा, स्वागत ढाबा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६८ व ८४ प्रमाणे कारवाई करून चालक व मद्यपींवर गुन्हे दाखल केले.

यात चालकांशिवाय एकूण सात मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ढाबाचालकास प्रत्येकी ३५ हजार रूपये व मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी ५०० रुपयाप्रमाणे दंड ठोठावला. वरील तीनही कारवाईमध्ये धाबा मालक आरोपींना एकूण एक लाख पाच हजार रुपये व सात मद्यसेवन करणाऱ्या आरोपींना तीन हजार ५०० रुपये एवढा दंड ठोठावला.

दरम्यान, जिल्ह्याती ग्रामीण भागांत ढाब्यावर अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत माधवराव मोरे यांनी थडी सावरगाव (ता.देगलूर) येथे दोन हजार ४०० रुपयांची विदेशी दारु जप्त करून देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तपास श्री. तलवारे करत आहे. तसेच सहायक पोलिस निरीक्षक सुरेश एकनाथ मांटे यांनीही हदगाव बसस्थानक समोरील रोडवर एक हजार ९०० रुपयांची देशी दारु जप्त केली आहे. हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून, श्री. चिंतळे तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com