हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चांगलाच धास्तावले आहेत..Nanded Garden For Children : चिमुकल्यांसाठी नांदेडमध्ये हवीत सुविधायुक्त हरित उद्याने.गेल्यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा व ज्वारी या पिकांची पेरणी केल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हरभरा व ज्वारी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले होते. त्यातच सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची बोळवण केली होती. अद्यापही काही शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळाली नाही. तसेच गेल्यावर्षी धुके व ढगाळ वातावरणाने तुरीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यातील जवळपास ३२ हजार हेक्टरवरील तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले होते. त्यातच दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही दिवस असेच वातावरण राहून अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने शेतकरी चांगलाच धास्तावले आहेत. .तुरीचे पीक चांगले आलेले असून झाडाला शेंगा लागल्या आहेत. ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे या पिकांवर अळीसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण, पावसाचा फटका तुरीच्या पिकाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एक लाख १८ हजार ७३९ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली असून हरभरा पीक चांगले आले बहरलेले आहे. अवकाळी पाऊस झाल्यास हरभरा पिकाला सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यानंतर ज्वारीच्या पिकालाही धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात ८ हजार ८५५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. हवामान विभागाने ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत..तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी कृषी दुकानातून महागडी कीटकनाशके आणून तुरीच्या पिकावर फवारणी करीत आहेत. परंतु, त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे तुरीच्या पिकाला सर्वाधिक फटका बसणार असल्याने उत्पादनात यंदाही घट होणार असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांना फटका बसला. त्यातच जे काही शेतकऱ्यांच्या पदरात पडले त्या शेतमालाला बाजारपेठेत भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे..यावर्षी खरिपात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे रब्बीच्या पिकाचा पेरा वाढविला आहे. यातून मागील नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, आता दोन दिवसापासून ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे यातून देखील नुकसान होते, की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.- भाऊराव शेळके, शेतकरी.Hingoli News : नको खिशाला ओझे, स्कॅन ॲण्ड पे ओके!; ग्रामीण भागातही कॅशलेसला पसंती.ढगाळ वातावरणामुळे तूर व हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यातच पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसे झाले तर आणखी अडचणीत भर पडणार आहे.- उत्तमराव काळे, शेतकरी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.