सावधान - नांदेडला कोरोनामुळे मंगळवारी दोघांचा मृत्यू, ९३ बाधित तर ५६ झाले बरे

अभय कुळकजाईकर
Tuesday, 2 March 2021

नांदेडला आजच्या एक हजार ४११ अहवालापैकी एक हजार ३१५ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ८३७ एवढी झाली असून यातील २२ हजार ३८५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ६०२ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या एकुण ६३६ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १८ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.     

नांदेड - मंगळवारी (ता. दोन मार्च) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार ९३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४४ तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे ४९ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ५६ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकुण ६३६ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १८ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

नांदेडला आजच्या एक हजार ४११ अहवालापैकी एक हजार ३१५ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ८३७ एवढी झाली असून यातील २२ हजार ३८५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. सोमवारी (ता. एक मार्च)  नांदेड तरोडा बुद्रुक येथील ७० वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर मंगळवारी (ता. दोन मार्च) नांदेड समिराबाग येथील ६५ वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ६०२ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

हेही वाचा - परभणी ः श्रीराम जन्मभूमीसाठी अडीच कोटीचा निधी संकलित
 

बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९३.९० टक्के 
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ६, नांदेड महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २९, देगलूर कोविड रुग्णालय १, मुखेड  कोविड रुग्णालय १, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ४, किनवट कोविड रुग्णालय ४, कंधार तालुक्यांतर्गत १, खासगी रुग्णालय १० असे एकूण ५६ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९३.९० टक्के आहे.  

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडमध्ये आगीत तीन दुकाने जळून खाक; जवळपास पंधरा लाखाचे नुकसान

६३६ बाधितांवर औषधोपचार सुरु 
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्र ३४, लोहा तालुक्यात ३, मुखेड १, लातूर १, नांदेड ग्रामीण १, कंधार २, हिंगोली १, परभणी १ असे एकुण ४४  बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्र ३७, कंधार तालुक्यात १, मुखेड १, हदगाव १, किनवट ५, यवतमाळ ४ असे एकूण ४९ बाधित आढळले. जिल्ह्यात ६३६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ४२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ७१, किनवट कोविड रुग्णालयात २१, मुखेड कोविड रुग्णालय ६, हदगाव कोविड रुग्णालय ६, महसूल कोविड केअर सेंटर ५३, देगलूर कोविड रुग्णालय ९, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण २५६, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ९३, खासगी रुग्णालय ७९ आहेत. मंगळवारी (ता. दोन मार्च) रोजी सायंकाळी पाच वाजता सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १४३ तर, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ३४ एवढी आहे.  

नांदेडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

नांदेड कोरोना मीटर

 • एकुण स्वॅब- २ लाख ३२ हजार ५३७
 • एकुण निगेटिव्ह - २ लाख ४ हजार ४५८
 • एकुण पॉझिटिव्ह - २३ हजार ८३७
 • एकूण बरे - २२ हजार ३८५
 • मंगळवारी पॉझिटिव्ह - ९३ 
 • मंगळवारी बरे - ५६
 • मंगळवारी मृत्यू - दोन
 • एकुण मृत्यू - ६०२                           
 • प्रलंबित स्वॅब - १५०
 • उपचार सुरू - ६३६
 • अतिगंभीर रुग्ण -१८

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caution: Two killed, 93 injured and 56 injured in Nanded corona on Tuesday nanded corona news