Nanded News : नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरू

जिल्हा परिषदेतर्फे नियोजन; १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
nanded
nandedsakal

नांदेड : शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन आणि प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करणे, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला - क्रीडा गुणांचा विकास करणे यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानात जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी ता. १५ फेब्रुवारीपर्यंत सहभागासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

या अभियानात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सहभागी होता येईल. तसेच शाळांना पुढीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल. त्यात विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग ६० गुण. शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग ४० गुण. सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन, आपला जिल्हा उर्वरीत महाराष्ट्र कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे तालुकास्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर व राज्यस्तर असे एकुण चार टप्पे अभियानाचे स्वरुप आहे.

राज्य स्तरावरील स्पर्धा प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी राज्यस्तरीय विजेता निवडण्यात येईल. जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग सर्वस्वी अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असणार आहे.

आॅनलाइन नोंदणी करता येणार

या अभियानात ता. १५ फेब्रुवारीपर्यत नोंदणी करावयाची असून या स्कुल पोर्टल लिंकवर https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4 नोंदणी करावी. तसेच संदेश, कात्रणे, जाहिरात, व्हिडीओ शेअर करण्यासाठीची https://drive.google.com/drive/folders/1SLpCMNhoiOAlfeJZ6rYzSVaD9IVXTzHn?usp=sharing या लिंकचा वापर करावा, असेही शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

अशी मिळणार शाळांना बक्षिसे

शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा यांना पुढीलप्रमाणे बक्षीसे मिळणार आहेत. तालुकास्तरावर पहिले बक्षीस तीन लाख रुपये, दुसरे दोन लाख तर तिसरे बक्षीस एक लाख रुपये आहे. जिल्हास्तरावर पहिले बक्षीस अकरा लाख रुपये, दुसरे पाच लाख तर तिसरे बक्षीस तीन लाख रुपये आहे. विभाग स्तरावर पहिले बक्षीस २१ लाख रुपये, दुसरे अकरा लाख तर तिसरे बक्षीस सात लाख रुपये आहे. राज्यस्तरावर पहिले बक्षीस ५१ लाख रुपये, दुसरे २१ लाख तर तिसरे बक्षीस ११ लाख रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com