नांदेडच्या या शहरात सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा मिरवणुकीद्वारे होतो सत्कार

file photo
file photo
Updated on

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरात सेवानिवृत्त जवानांचा सत्कार करण्याची परंपरा असून या सत्कार सोहळ्यात शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. शहरातील जवान माधव माटे हे २० वर्ष देशाची सेवा करुन निवृत्त झाल्याबद्दल शहरात भव्य दिव्य मिरवणुक काढून सत्कार करण्यात आला. शहरातील नगरात गल्लो- गल्लीत रांगोळी, फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच आतिषबाजी करण्यात आली. 

अर्धापूर शहरातील नागरिकांच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा मिरवणुक काढून सत्कार करण्यात येतो. शहरातील श्रीरामनग भागात राहणारे माधव मारोतराव माटे हे विस वर्ष देशसेवा करुन निवृत्त झाले. ते शेतकरी कुटुंबातील असून सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतून शिक्षण घेतले. कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा व देशसेवा करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस बल (सीआरपीफ) मध्ये सहभागी झाले होते. 

सेवानिवृत्त झाल्यानंतर घरी परत आल्यावर त्यांची तहसील कार्यालय, बसस्थानक परिसर, बाजारपेठ अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. तर मारुती मंदिरात महाअर्ती करुन घोड्यावरुन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. ही मिरवणुक मारुती मंदिर, बालाजी मंदिरचौक, सावित्रीबाई फुलेनगर मार्गे जाऊन श्रीरामनगर भागातील माटे यांच्या निवास्थानासमोर सांगता झाली. नागरिकांच्या वतीने माधव माटे यांचे सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच संपुर्ण माटे कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, फौजदार कपील आगलावे आदी उपस्थित होते.

मारुती मंदिर संस्थानच्या वतीने महाआरती करुन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थांनचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रल्हाद माटे, माधव साखरे, संतोष माटे, विलास साबळे, लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर आदी उपस्थित होते. फुलेनगर मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच गोविंद सिनगारे, शिवराज डाढाळे, बालाजी माटे, आनंद मोरे, नितीन डाढाळे, अंकूश माटे, नवनाथ राऊत, बाळू माटे आदी उपस्थित होते. तर श्रीरामनगरात सत्कार सोहळ्यास भगवान डक, केशव डक, रवींद्र मोटरवार, गंगाधर राऊत, अरुण नवले, सोनाजी राऊत आदी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com