जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले, हेच माझे खरे शिक्षक... 

अभय कुळकजाईकर
Saturday, 5 September 2020

राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ता. पाच सष्टेंबर रोजी भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपण शिक्षक दिन उत्साहात साजरा करत असतो. या निमित्ताने नांदेडला जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शिक्षकांविषयी व्यक्त केलेल्या भावना....

नांदेड - शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत अनेक शिक्षक, प्राध्यापकांचे मला मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्याचबरोबर आई - वडील आणि नंतर पत्नी यांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा असून तेदेखील खऱ्या अर्थाने माझे शिक्षकच आहेत, अशा शब्दांत नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शिक्षक दिनानिमित्त भावना व्यक्त केल्या.
 
राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ता. पाच सष्टेंबर रोजी भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपण शिक्षक दिन उत्साहात साजरा करत असतो. या निमित्ताने नांदेडला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी देखील आपल्या शिक्षकांविषयी भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा - नांदेड- राज्यातील एसटी चालक-वाहक महिला न्यायाच्या प्रतिक्षेत

आई वडिलांचे पाठबळ कायम
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण चंद्रपूर येथे झाले. वडील विठोबा ईटनकर हे मॅनेजर होते तर आई शारदा गृहिणी. आई नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायची, त्यामुळे मला अभ्यासाची गोडी निर्माण झाली. वडील नेहमी सांगायचे, की जीवनात चढ-उतार, यश-अपयश हे येत - जात राहते. त्याला धैर्याने सामोरे जायचे. सातत्य टिकवून प्रयत्न केले तर यश मिळतेच. त्यामुळे वडिलांचाही मोठा आधार वाटायचा आणि त्यांचे पाठबळ कायम असायचे. आई - वडिलांची सतत प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असल्यामुळे यश मिळत गेले असल्याचे डॉ. विपीन यांनी सांगितले.

चंद्रपूर, नागपूरला झाले शिक्षण 
चंद्रपूरला शालेय शिक्षण घेत असताना प्रभा मॅडम यांनी शिकवण्यासोबतच सतत प्रोत्साहनही दिले. त्याचा भविष्यात फायदा झाला. बारावीनंतर नागपूरला मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस झाले. त्यानंतर मी पदव्युत्तर (पीजी) करण्यासाठी चंदीगडला गेलो. महाविद्यालयीन जीवनातही अनेक प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले. पण त्या काळात आम्ही स्वतःच अभ्यास करायचो. 

हेही वाचलेच पाहिजे - Video : नांदेडमध्ये कोविड पॉझिटिव्ह विद्यार्थी ‘जेईई’च्या परिक्षेपासून वंचित

पत्नी एकप्रकारे माझी शिक्षिकाच

नागपूरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पदव्युत्तर (पीजी) शिक्षण घेण्यासाठी चंदीगडला गेलो. त्या ठिकाणी मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी शिकण्यासोबतच मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. त्याचबरोबर युपीएससी परिक्षा देण्यासाठी अभ्यासही सुरु केला. त्यावेळी माझी पत्नी डॉ. शालिनी हिने महत्वाची भूमिका बजावली. डॉ. शालिनी ही देखील एमबीबीएस असून तिने मला स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन केले. खंबीरपणे ती माझ्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे ती देखील एकप्रकारे माझी शिक्षिकाच असल्याचे डॉ. विपीन यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Dr. Vipin said, this is my real teacher ..., Nanded news