esakal | सात दिवसानंतर नागरिकांना दिलासा.....कशामुळे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बुधवारी (ता. २७) तापमानात घट होवून पारा ४३.५ अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर आद्रताही ३१ टक्के असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या नांदेड येथील नोंदणी केंद्रातून मिळाली.

सात दिवसानंतर नागरिकांना दिलासा.....कशामुळे ते वाचा

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात मागील सात दिवसापासून कमाल तापमानाचा पारा चढता होता. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत होती. मागील सलग दोन दिवस कमाल तापमान ४५.५ अंशावर पोचले होते. तर हवेतील आद्रताही २८ टक्क्यापर्यंत खालावली होती. बुधवारी (ता. २७) तापमानात घट होवून पारा ४३.५ अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर आद्रताही ३१ टक्के असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या नांदेड येथील नोंदणी केंद्रातून मिळाली.

एप्रीलनंतर वाढले तापमान 
जिल्ह्यात यंदा मार्च व एप्रीलमध्ये उन्हाची तिव्रता जाणवली नाही. एप्रील महिन्याचे सरासरी कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यामुळे नागरिकांना याचा त्रास जाणवला नाही. परंतु यानंतर मात्र मे महिन्यात तापमानात वाढ होत गेली. ता. दोन मे पासून कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यानंतर सलग आठ दिवस तापमान चढते राहिले. 

हेही वाचा.....‘एमएसपी’तंर्गत ५६ कोटींचा हरभरा खरेदी

तापमानात चढ-उतार
जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमण झाल्याने ता. १० मे रोजी ३५ अंश सेल्सिअस पर्यंत खालावला होता. यानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली. ता. २० मे नंतर कमाल तापमान ४२ अंशाच्या पुढे राहिले. ता. २२ मे रोजी ४३.५, ता. २३ मे रोजी ४४.०, ता. २४ मे रोजी ४५. अंश सेल्सिअस, ता. २५ मे रोजी ४५.५ व ता. २६ मे रोजी पारा ४५.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यामुळे नागरिक उकाड्याने हैरान झाले होते. दरम्यान बुधवारी (ता. २७) कमाल तापमानात दोन अंशाने घट होवून पारा ४३.५ अंश सेल्सिअस पर्यंत खालावला. तर हवेतील आद्रताही दोन टक्क्याने वाढ होवून ३१ टक्क्यांवर पोचल्याची माहिती नांदेड येथील भारतीय हवामान विभागाच्या अंशकालीन तापमान नोंदणी केंद्राचे हवामान निरीक्षक बालासाहेब कच्छवे यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना गर्मीपासून दिलासा मिळाला.  

हेही वाचलेच पाहिजे....संकट टळतयं ः जिल्ह्यात केवळ ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

अशोक चव्हाणांसाठी महामृत्युंजय जप
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली. त्यातून त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी, यासाठी शौय परशुराम प्रतिष्ठानकडून बुधवारी (ता. २७) शहरासह तालुक्याच्या ठिकाणी महामृत्युंजय अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले.

तीन दिवस होणार अनुष्ठान
नांदेडला आयटीआयजवळील महात्मा फुले मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत तीनदिवसीय अनुष्ठानाला सुरवात झाली. यावेळी श्री. चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी या अनुष्ठानाचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. यावेळी गजानन कळगावकर, मंगेश जोशी सवनेकर, अभिषेक जोशी, शुशील घोडेकर, प्रसाद कुलकर्णी, किरण पाठक, गजानन देसाई, शैलेश कुलकर्णी, किशोर विष्णुपुरीकर, महेश देवापूरकर आदी पुरोहित उपस्थित होते.

चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा
दरम्यान, पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याचबरोबर पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्यासह दोन मुली जया आणि सुजया हे तिघेजण बुधवारी दुपारी अडीच वाजता नांदेडहून मुंबईला विमानाने रवाना झाल्याची माहिती श्री. चव्हाण यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. 

loading image
go to top