‘एमएसपी’तंर्गत ५६ कोटींचा हरभरा खरेदी 

harbhara kharedi
harbhara kharedi

नांदेड : किमान हमी दरानुसार (एमएसपी) जिल्ह्यात सुरु असलेल्या पंधरा हरभरा खरेदी केंद्रांवर आजपर्यंत सहा हजार ६२५ शेतकऱ्यांचा एक लाख १३ हजार ८११ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली. या खरेदीपोटी ५५ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून मिळाली.

दहा एप्रीलपासुन पंधरा ठिकाणी खरेदी 
बाजारात हरभराचे दर पडल्याने शासनाने किमान हमी दरानुसार (एमएसपी) चार हजार ८७५ रुपये प्रतिक्विंटल दराने हरभऱ्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार जिल्ह्यात (ता. दहा) एप्रीलपासून हरभरा खरेदी सुरू झाली. ही खरेदी महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत सहा ठिकाणी सुरू झाली. यात नांदेड, मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली व देगलूर येथील खरेदी केंद्राचा समावेश आहे. 

विदर्भ को-ऑपरेटिव्हकडून तीन ठिकाणी खरेदी
विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नायगाव, भोकर व धर्माबाद या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले. तसेच महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून (महा एफपीसी) सहा ठिकाणी खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यात धानोरा (ता. धर्माबाद), करडखेड (ता. देगलूर), बरबडा (ता. नायगाव), डोणगाव (ता. बिलोली), नारनाळी (ता. कंधार) तसेच मांडवा (ता. किनवट) येथील खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

५५ कोटी ४७ लाखांचा हरभरा खरेदी
हरभरा विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी ता. २५ फेब्रुवारीपासुन वीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी सहा हजार ६२५ शेतकऱ्यांचा एक लाख १३ हजरी ८११ क्विंटल हरभरा विक्री झाला आहे. या विक्रीपोटी शेतकऱ्यांना ५५ कोटी ४७ लाख रुपये देण्याची प्रक्रिया सुरु आहे. हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी विक्री ता. ३१ मेपर्यंत होणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. एस. पाटील यांनी दिली. 

‘अभाविप’चे ब्लड फॉर नेशन अभियान
कोरोना महामारीच्या संकटाला सामोरे जात आहोत. टाळेबंदीमुळे रक्तदात्यांची संख्या घटुन रक्तपेढीमध्ये रक्त व त्यातील घटकांची अनुपलब्धता निर्माण झाली आहे. अशा संकटाच्या काळात अभाविपने ब्लड फॉर नेशन अभियान या महाराष्ट्रव्यापी रक्तदान अभियानाचा निश्चय केला आहे. महाराणा प्रताप जयंती पासून (ता. २५ मे) ते स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीपर्यंत (ता. २८ मे) ही मोहीम चालवणार आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थि परिषद व स्टुडंट्स फाॅर सेवा नांदेड मार्फत गुरुवारी (ता. २८) रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अशा संकटाच्या काळात प्रत्येकाने रक्तदान करावे. प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या शेजारी, गोळवलकर गुरुजी रक्तपेढी येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत सामाजीक अंतराचे पालन करुन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com