नांदेडकरांना दिलासा - कोरोनाबाधितांची संख्या घटली 

अभय कुळकजाईकर
Thursday, 13 August 2020

नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन हजार ६९९ झाली आहे. गुरूवारी दिवसभरात ७१ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दोन हजार १२७ झाली आहे. कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या १३४ झाली आहे. सध्या रुग्णालयात एक हजार ४१९ रुग्णांवर नांदेड शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु असून गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांची संख्या १४२ आहे. 

नांदेड - नांदेडला गुरूवारी (ता. १३) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ६२९ पैकी ५२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने नांदेडकरांना दिलासा मिळाला असून दिवसभरात ७१ जणांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, १४२ रुग्णांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरु असताना पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. गुरूवारी सायंकाळी प्राप्त अहवालापैकी ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन हजार ६९९ झाली आहे. गुरुवारी दिवसभरात आरटीपीसीआर तपासणीद्वारे १९ तर ॲन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे ६३ रुग्ण असे एकूण ८२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा - पुतण्या मला वाचव... म्हणण्याची काकावर आली वेळ 

१४२ रुग्णांची प्रकृती गंभीर
गुरूवारी दिवसभरात पाच जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्यामध्ये नांदेडच्या नाईकनगर येथील ७८ वर्षीय पुरुष, बळीरामपूर येथील ३० वर्षीय महिला, धनेगाव येथील ४९ वर्षाची महिला, दिलीपसिंग कॉलनीतील ५८ वर्षाचा पुरूष तसेच नायगाव येथील ६५ वर्षाचा पुरूषाचा समावेश आहे. आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या १३४ झाली आहे. सध्या रुग्णालयात एक हजार ४१९ रुग्णांवर नांदेड शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु असून गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांची संख्या १४२ आहे. 

दोन हजार १२७ रुग्ण झाले बरे
गुरूवारी दिवसभरात ७१ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दोन हजार १२७ झाली आहे. विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडमधील पंजाब भवन कोविड सेंटर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि नांदेड जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, मुखेड, देगलूर, लोहा, हदगाव, भोकर, कंधार, धर्माबाद, किनवट, अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, बारड आणि उमरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरु आहेत. खासगी रुग्णालयात १२५ रुग्णांवर उपचार सुरु असून औरंगाबादला चार तसेच निजामाबाद व हैदराबाद येथे प्रत्येकी एक रुग्ण संदर्भित करण्यात आला आहे. 

गुरूवारी दिवसभरात तालुकानिहाय आढळलेले रुग्ण 
नांदेड महापालिका - २०, नांदेड ग्रामिण - दोन, लोहा - दोन, बिलोली - पाच, देगलूर - सहा, मुखेड - २१, भोकर - एक, धर्माबाद - पाच 
भोकर - एक, मुदखेड - तीन, कंधार - सहा, अर्धापूर - दोन, उमरी - तीन, किनवट - तीन, नायगाव - एक, परभणी - एक. 
 
हेही वाचलेच पाहिजे - चार दिवसांच्या रिमझिम पावसाने पाणीपातळीत वाढ, कुठे ते वाचा... 
 
नांदेड कोरोना मीटर
 

 • एकूण सर्व्हेक्षण - एक लाख ५० हजार १४५ 
 • एकूण घेतलेले स्वॅब - २५ हजार ४८२ 
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - १९ हजार ५३३ 
 • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - तीन हजार ६९९ 
 • आज गुरूवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ८२ 
 • एकूण मृत्यू - १३४ 
 • आज गुरूवारी मृत्यू - पाच 
 • एकूण रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - दोन हजार १२७ 
 • आज गुरूवारी सुटी दिलेले रुग्ण - ७१ 
 • सध्या रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण - एक हजार ४१९ 
 • आज गुरूवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ७१९ 
 • आज गुरूवारी गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - १४२ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consolation to Nandedkar - The number of corona sufferers decreased, Nanded news