esakal | डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात आणखी एका ऑक्सीजन प्लँटची उभारणी
sakal

बोलून बातमी शोधा

आॅक्सीजन प्लाॅन्ट

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात आणखी एका ऑक्सीजन प्लँटची उभारणी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोवीड संक्रमणाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्यसेवा मजबूत करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. राज्य शासनाचा निधी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारणीसाठी मंजूर करुन घेतला. यातील पुढील भाग म्हणून केंद्र शासनाच्या निधीतून जिल्ह्यासाठी आणखी एका ऑक्सीजन प्लँटची मंजुरी मिळाली असून यासाठी पालकमंत्री चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कामी आले आहेत.

देशातील विविध शहरामध्ये पी. एम. केअर फंडातून ऑक्सीजन प्लँटची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. हे ऑक्सीजन प्लँट उभारणीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे प्रमुख व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाठपुरावा करुन नांदेड जिल्ह्यासाठी आणखी एका ऑक्सीजन प्लँटची मंजुरी मिळवून घेतली आहे. हा ऑक्सीजन प्लँट येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यान्वित होणार आहे.

हेही वाचा - ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'सात वर्षांमध्ये मोदी सरकारने कसं काम केलंय आणि तुम्हाला या सरकारबद्दल नक्की काय वाटतंय?

शहरामध्ये आणखी एका ऑक्सीजन प्लँट उभारल्यानंतर कोवीड रुग्णांसाठी लागणार्‍या ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य शासनासोबतच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे पाठपुरावा करुन त्यांनी या प्लँटची मंजुरी मिळविली आहे.