कोरोना ब्रेकिंग - नांदेडला रात्री १२ रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ३८७ 

अभय कुळकजाईकर
मंगळवार, 30 जून 2020

मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालापैकी १२४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर रात्री सात वाजता आलेल्या अहवालात १२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३८७ झाली आहे. 

नांदेड - नांदेडला दररोज कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण आढळून येत असून बुधवारी (ता. ३० जून) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चार तर रात्री सात वाजेपर्यंत १२ असे दिवसभरात १६ रुग्ण आढळून आले असून आता जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ३८७ झाली आहे. आत्तापर्यंत १७ जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २८३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालापैकी १२४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर रात्री सात वाजता आलेल्या अहवालात १२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३८७ झाली आहे. 

हेही वाचा - नांदेडकरांनो गर्दी केली तर समुह संसर्गाचा धोका वाढणार!

२८३ कोरोनामुक्त झाले

कोरोना विषाणूसंदर्भात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या अहवालानुसार चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दोन रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २८३ एवढी झाली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. २९) रात्री नांदेडमधील नवीन कौठा येथील एका ५३ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

हदगाव, मुखेड तालुक्यात रुग्ण 
दिवसभरात आलेल्या चार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोन रुग्ण नांदेड शहरातील तर दोन ग्रामिण भागातील आहेत. छत्रपती चौक येथील पुरुष (वय ५७), शिवाजीनगर येथील महिला (वय ३२) तसेच पळसा (ता. हदगाव) येथील १६ वर्षाची युवती आणि बेटमोगरा (ता. मुखेड) येथील ५६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. संध्याकाळी सात वाजता आलेल्या अहवालात बाफना येथील एक पुरुष (वय ६४), आंबेडकर नगर येथील एक मुलगी (वय पाच), आंबेडकर नगर येथील एक पुरुष (वय ३३), असर्जन येथील तीन महिला (वय ३७, दहा आणि ११), असर्जन येथील एक पुरूष (वय ४२), विनायकनगर येथील एक महिला (वय ३४), वसंतनगर येथील एक पुरुष (वय ५२) तसेच जिल्ह्यातील मुक्रमाबाद येथील एक पुरुष (वय २०), एक महिला (वय ३८) यांचा समावेश आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - हात कपाळावर अन् डोळे आभाळाकडे
 
दहा रुग्णांची प्रकृती गंभीर

उपचार सुरु असलेल्यांपैकी दहा रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यामध्ये चार महिला आणि सहा पुरूषांचा समावेश आहे. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पंजाब भवन कोविड सेंटर तसेच जिल्ह्यातील मुखेड, हदगाव आणि मुखेड कोविड सेंटर येथे आणि जिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद येथे सात तर सोलापूर येथे एक रुग्ण संदर्भित करण्यात आले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking - 12 patients tested positive at night in Nanded, total 387 patients, Nanded news