Corona Breaking : दिवसभरात पाच रुग्ण पॉझिटिव्ह, तिघांची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

बुधवारी (ता. २४) दिवसभरात पाच रुग्ण आढळून आले तर औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेल्या बाधितांपैकी तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

नांदेड : मंगळवारी (ता. २३) घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी बुधवारी (ता. २४) सकाळी ४१ आणि सायंकाळी ९५ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त झालेल्या अहवालापैकी ३७ अहवाल निगेटिव्ह, दोन पॉझिटिव्ह तर संध्याकाळी आलेल्या अहवालात पुन्हा तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दिवसभरात पाच बाधित रुग्णांची भर पडल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

बुधवारी (ता. २४) दिवसभरात पाच रुग्ण आढळून आले तर औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेल्या बाधितांपैकी तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३२६ इतकी झाली असून, आत्तापर्यंत १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर २४८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या ६४ बाधितावर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा- खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना पोलिस कोठडी

पिरबुऱ्हाणनगरातील दोन मुलांचा यात समावेश

दिवसभरात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये गुलजारबाग येथील ६५, रहेमतनगर ३६ वर्ष, तर दुसरा रुग्ण देगलूर नाका परिसरातील ६७ वर्षीय व्यक्ती शिवाय पिरबुऱ्हाणनगरातील दोन व नऊ वर्ष वयोगटातील मुलांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही रुग्णास विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३२६ इतकी झाली असल्याचे डॉ. भोसीकर म्हणाले.   

२४८ व्यक्ती कोरोनातून बरे

 बुधवारी (ता. २४) दिवसभरात पाच रुग्ण आढळून आले तर औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेल्या बाधितांपैकी तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३२६ इतकी झाली असून, आत्तापर्यंत १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर २४८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या ६४ बाधितावर उपचार सुरु आहेत.

दोन महिला दोन पुरुषांची प्रकृती गंभीर

आतापर्यंत ३२६ बाधितांपैकी २४८ बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरित ६४ बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. त्यात वय ५० व ५२ वर्षाच्या दोन स्त्रिया व ५२ आणि ५४ वर्षाच्या दोन पुरुषांचा यात समावेश असल्याचे डॉ. भोसीकर म्हणाले. 

हेही वाचा- धक्कादायक ! ‘ते’ दोघे अखंड प्रेमात अन्...

गुरुवारी ९० स्वॅब अहवाल प्राप्त होणार
नांदेड जिल्ह्यात ६४ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १२, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४८, तीन रुग्ण औरंगाबाद व एक रुग्ण सोलापूर येथे संदर्भित करण्यात आले आहेत. बुधवारी पुन्हा ९० संशयितांचे स्वॅब तपासणी करिता घेण्यात आले असून त्यांचा अहवाल गुरुवारी संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता डॉ. भोसीकर यांनी वर्तविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking: Five Patients Tested Positive During The Day Three Overcome Corona Nanded News