खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

बुधवारी (ता. २४) देगलूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.जी. कोळी यांनी बिलोली न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता सात जणांना तिन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नांदेड : दुर्मिळ जातीच्या दोन खवल्या मांजराची तस्करी करतांना वन विभागाच्या पथकाने सात आरोपींना रंगेहात मंगळवारी (ता. २३) पकडले. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंदवून बुधवारी (ता. २४) देगलूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.जी. कोळी यांनी बिलोली न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता सात जणांना तिन दिवसाची पोलिस (वन) कोठडी सुनावण्यात आली आहे.

जंगलातील दुर्मिळ प्राणी असलेल्या दोन खवल्या मांजराची परराज्यातून तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. यासाठी भोकर, बोधडी, हदगाव येथील वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बिलोली शहरातच या आंतरराज्य तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये आरोपी रवींद्र संतोष स्वामी, रतन भिवाजी हणवते, सुनील साहेबराव वायकोळे, फकीर माहेबूब शेख, तोहीतपाशा शेख इस्माईल, तकियोद्दीन खैरोद्दीन खतीब, मुजिगोद्दीन खैरोद्दीन खतीब या सात आरोपीविरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ५१ नुसार कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -  हरणाच्या पाडसाला मिळाले जिवदान, कुठे? ते वाचाच
 
वनविभागाची कारवाई

नांदेडचे उप वनरक्षक आशिष ठाकरे, साह्ययक वनरक्षक डी. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे, इस्लापुरचे आरएफओ श्री शिंदे, हदगावचे आरएफओ श्री रुद्रावार, बोधडीचे आरएफओ श्री जाधव यांच्या पथकाने रात्रभर आपल्या डोळयात अंजन घालून करून फिल्मी स्टाईल या टोळीचा पाठलाग करून त्यांना खवल्या मांजरासह पकडले. यावेळी भोकर, इस्लापुर, बोधडी, हदगाव व देगलूर विभागातील वनपाल, वनरक्षकांचा या पथकात समावेश होता. सदरली गुन्ह्याचा तपास देगलूर विभागाचे आरएफओ जी. एल. कोळी यांच्याकडे दिला आहे.

खवल्या मांजराची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी

तस्करीमधील अती दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या खवल्या मांजर अनुसूचि न.१ मधला प्राणी म्हणून गणल्या जातो. आणि आंतराष्ट्रीय काळया बाजारपेठेत एका मांजराची किंमत लाखांमध्ये असल्याचे समजते. खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे कनेक्शन बिलोलीत एक महामंडळाच्या चालकापर्यन्त असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरील वाहकास ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असून तो अद्याप री सापडला नाही. खवल्या मांजराच्या तस्करावर कारवाई करण्याची या विभागात पहिलीच वेळ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police custody for scaly cat smugglers nanded news