कोरोना ब्रेकिंग - नांदेडला मंगळवारी १६२ पॉझिटिव्ह

file photo
file photo

नांदेड - सोमवारी दिलासा मिळालेला असताना पुन्हा मंगळवारी (ता. ११) प्राप्त झालेल्या अहवालात १६२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचबरोबर सध्या ११५ रुग्णांची प्रकृती गंभीर असून दिवसभरात सहा जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी १३० जणांना औषधोपचारानंतर मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी एक हजार ५१६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात आरटीपीसीआर चाचणीद्वारे ४४ तर ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे ११८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

११५ जणांची प्रकृती गंभीर

आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या तीन हजार ५१८ झाली आहे. मंगळवारी १३० रुग्ण औषधोपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या एक हजार ९०९ झाली आहे. त्याचबरोबर सध्या विविध रुग्णालयात एक हजार ४६५ रुग्णांवर उपचार सुरु असून त्यापैकी ११५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.   

१२६ जणांचा झाला मृत्यू
मंगळवारी सहा जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असून त्यात कावलगुडा (ता. उमरी) येथील ५० वर्षाचा पुरुष, नांदेड शहरातील तरोडा नाका दीपनगर येथील ७६ वर्षाचा पुरुष, नांदेडच्या खुसरोनगर येथील ७० वर्षाचा पुरुष, करडखेड (ता. देगलूर) येथील ७० वर्षाची महिला, हिमायतनगर येथील ६५ वर्षाचा पुरूष आणि नांदेडमधील किल्ला रोड येथील ६५ वर्षाचा पुरूष यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील बाधित रुग्णापैकी १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्णांची तालुकानिहाय संख्या
नांदेड महापालिका - ५२, नांदेड ग्रामीण - सात, देगलूर - ४२, हिमायतनगर - एक, हदगाव - एक, धर्माबाद - १८, लोहा - तीन, मुदखेड - सहा, भोकर - सहा, कंधार - एक, माहूर - दोन, नायगाव - पाच, किनवट - पाच, बिलोली - दहा, हिंगोली - दोन, यवतमाळ - एक, 

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण सर्व्हेक्षण - एक लाख ५० हजार ६१
  • एकूण घेतलेले स्वॅब - २२ हजार ८५०
  • एकूण निगेटिव्ह स्वॅब - १७ हजार ५५२
  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - तीन हजार ५१८
  • आज मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्ण - १६२
  • एकूण मृत्यू संख्या - १२६
  • आज मंगळवारी मृत्यू संख्या - सहा
  • एकूण रुग्णालयातून सुटी दिलेली रुग्ण संख्या - एक हजार ९०९
  • आज मंगळवारी सुटी दिलेली रुग्ण संख्या - १३०
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - एक हजार ४६५
  • सध्या गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - ११५
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - २९७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com