Corona Breaking : सोमवारी पुन्हा नांदेडला धक्का ; १२ जण पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे
Monday, 22 June 2020

जून महिण्यापासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वरचेवर वाढतच आहे. विशेष म्हणजे शहरासह जिल्ह्यातील रोज लहान मोठ्या खेडेगावत नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळुन येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच धांदड उडत आहे. रोज नव्या भागात रुग्ण आढळुन येत असल्याने यंत्रणा संतर्क असली तरी, त्यावर पुरेपुर नियंत्रण मिळवणेदेखील कठिण होताना दिसून येत आहे. असे असले तरी, तरुण वयातील बहुतेक पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत.  

नांदेड : दररोज सकाळी येणारा स्वॅब अहवाल सोमवारी (ता.२२) सायंकाळी पाचऐवजी पावनेसहाच्या दरम्यान प्राप्त झाला. यात ५९ स्वॅब अहवाल आले. त्यातील १२ रुग्णांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

या शिवाय आदिलाबाद येथुन एक पॉझिटिव्ह रुग्ण नांदेडला संदर्भित करण्यात आला. सर्व मिळुन जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३१७ इतकी झाली आहे. नव्याने सापडलेले रुग्ण धोबी गल्ली ४० वर्षीय, रहेमतनगरातील २२ वर्षीय, बिलाल नगरातील ३७ आणि ५७ वर्षीय, पीरबुऱ्हाणनगरातील २६, २९ आणि ३१, भगतसिंग रोड येथील ५८ वर्षीय असे एकूण आठ पुरुषांचा तर, पिंपळगाव (नांदेड) १८ व ३८ वर्षीय दोन महिला यासह चिखलभोसी ४५ व रिसनगाव येथील १९ वर्षाच्या महिलेसह एकूण १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
हेही वाचा-  Video - गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविणे आहे शक्य, कसे? ते वाचाच ​

६५ रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू
सोमवारी पंजाब भवन कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले १४ व मुखेड कोविड केअर सेंटरमधील पाच असे एकूण १९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आत्तापर्यंत आढळुन आलेल्या ३१७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या ६५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून यातील ५० आणि ५२ असा दोन महिलांची व ५२ आणि ५४ वर्षाच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ.भोसीकर यांनी सांगितले. 

हेही वाचा-  नांदेडला पावणेतीन लाखांचा गुटखा पकडला

औरंगाबाद येथे सात रुग्ण संदर्भित

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळुन आलेल्या ३१७ रुग्णांपैकी १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेल्या ६५ रुग्णापैकी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात १४, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४२, लोहा कोविड केअर सेंटर येथे दोन रुग्ण दाखल असून, सात रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking: Nanded Hit Again On Monday 12 positive Nanded News