Corona Breaking: ः गुलजारबागमधील ‘ती’ महिला काल पॉझिटिव्ह, आज मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

गुलजारबाग येथील एका ५५ वर्षीय  महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या दोन्ही रुग्णांना उपचरासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु यातील महिलेची रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रकृती बरी नव्हती. दरम्यान सोमवारी या महिलेचे निधन झाले.  

नांदेड : रविवारी पहिला अहवाल आला तो निरंक. त्याच्या काही तासाने पुन्हा ३२ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यात दोन व्यक्तींचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. यातील गुलजार बाग येथील एका ५५ वर्षीय महिलेचा समावेश होता. या महिलेचा सोमवारी (ता.आठ जून) सकाळी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.  

रविवारी आढळुन आलेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णामध्ये उमर कॉलनी येथील ५4 वर्षीय पुरुष तर गुलजारबाग येथील एका ५५ वर्षीय  महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या दोन्ही रुग्णांना उपचरासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु यातील महिलेची रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रकृती बरी नव्हती. दरम्यान सोमवारी या महिलेचे निधन झाले.  

हेही वाचा- ह्रदयद्रावक ; आई, डोळे उघडून बघ ना, कंठ दाटून चिमुकल्यांनी फोडला टाहो...

५२ रुग्णावर उपचार सुरु

यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९२ इतकी झाली आहे. उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे. आत्तापर्यंत १३१ रुग्ण बरे होऊन घरी पोहचले आहेत. सध्या जिल्ह्यात ५२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची व २७ अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. भोसीकर यांनी माहिती दिली. 

रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या ५२ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अजून तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असून यात एका ६५ वर्षीय महिलेचा तर दोन पुरुषांचा समावेश आहे.  रविवारी (ता.सात जून) पंजाब भवन यात्रीनिवास येथील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील गावासहीत तालुके व शहरी भागात हजारो नागरीकांची रोज युद्ध पातळीवर आरोग्य तपासणी केली जात आहे.
 
 हेही वाचा- बाप-लेकीवर काळाचा घाला...

जिल्ह्याची द्विशतकाकडे वाटचाल

कोरोनाची लक्षणे आढळुन आलेल्या संशयित व्यक्तींचे स्वॅब घेउन ते लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जात आहे. त्यामुळे शहर आणि गाव खेड्यातील नवीन भागात तुरळक ठिकाणी नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. हळुहळु वाढत असलेली पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाटत असली तरी, मागील आठवड्यात तिनच दिवसात ३७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे द्विशतक होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नागरीकांना सुरक्षिततेसाठी वारंवार आवाहन केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking: She Woman In Gulzarbagh Tested Positive Yesterday Died Today Nanded News