esakal | कोरोना संकट : मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना चपराक; आमदार संतोष बांगरने मतदारांसाठी तोडला ९० लाखाचा एफडी

बोलून बातमी शोधा

आमदार संतोष बांगर
कोरोना संकट : मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना चपराक; आमदार संतोष बांगरने मतदारांसाठी तोडला ९० लाखाचा एफडी
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी कोरोनाचे महाभंयकर संकट ओळखून आपल्या मतदार संघातील गरजू व गरीब रुग्णांना उपचार वेळेत मिळावा, त्यांची जिवीत हानी होऊ नये यासाठी पुढाकार घेतला. एवढेच नाही तर त्यांनी चक्क ९० लाखाचा एफडी तोडून मतदार संघासाठी नियोजन करण्यासाठी सदर रक्कम त्यांनी एका खासगी औषध विक्रेत्याकडे सुपुर्त केली. त्यांच्या या विधायक कामामुळे संबंध मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना चपराक दिल्याचे बोलल्या जात आहे. सोशल माध्यमावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी स्वतः चा एफडी मोडून नव्वद लाख रुपये एका खाजगी वितरकाला दिले. कारण हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना हजारो रुग्ण या इंजेक्शनसाठी तडफडत असताना जिल्हा प्रशासन रकमेअभावी रेमडेसीविर हे इंजेक्शन आणण्यास हतबल झाले होते.

हेही वाचा - Good News:रेमडेसिव्हिर न देता सात बाधित झाले बरे; नांदेड प्रशासनाचे यश

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला आमदार संतोष बांगर धावून आले आणि कोरोना रुग्णांना वेळेवर रेमडेसीविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी स्वतः एफडी मोडून नव्वद लाख रुपये दिले. सामान्य जनतेतून त्यांच्या या कृतीमुळे समाधान व्यक्त करण्यात येत असताना काही राजकीय मंडळी याचेही क्रेडिट घेण्यासाठी पुढे येत आहेत.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर या काळामध्ये निस्वार्थ जनतेची सेवा करतायत. तर दुसरीकडे काही राजकीय नेते मंडळी मात्र फक्त घरी बसून हे मी केलं ते मी केलं अस सांगून खोटी लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपड करतायत. दुसरीकडे मात्र काम करणारा नेता कुठेही जाहिरातबाजी करतांना दिसत नाहीत ते फक्त त्यांच्या सेवेत मग्न आहेत.

कोरोनामुळे अनेक कुटुंबावर संकट कोसळले आहे. यातून रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रुग्णालयात भेट दिल्यावर त्याचे हाल पाहवत नाहीत त्यांना औषध गोळ्या वेळेवर मिळाव्यात यासाठी संबंधीताना सांगत आहे. मात्र इंजेक्शनसाठी येणाऱ्या अडचणी पाहता त्या दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.

- संतोष बांगर, आमदार कळमनुरी, जिल्हा हिंगोली.

संपादन- प्रल्हाद कांबळे