esakal | कोरोनाचे सावट : नागपंचमीचा जुगार होणार काॅरन्टाईन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शहरी भागासह ग्रामिण भागात झोक्यांच्या आनंद घेतात. तसेच महिलां वर्ग शिराळ करून आपल्या पारंपारीक प्रथेला उजाळा देतात. एवढेच नाही तर गावातील तरुण मंडळी जुगार खेळतात.

कोरोनाचे सावट : नागपंचमीचा जुगार होणार काॅरन्टाईन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मराठवाड्यात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणाला शहरी भागासह ग्रामिण भागात झोक्यांच्या आनंद घेतात. तसेच महिलां वर्ग शिराळ करून आपल्या पारंपारीक प्रथेला उजाळा देतात. एवढेच नाही तर गावातील तरुण मंडळी जुगार खेळतात. मात्र या वर्षी लाॅकडाउन असल्याने जुगाराचे डाव क्वारंटाईन होतात की काय असा प्रश्न जुगार खेळणाऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. 

ता. २५ जुलै रोजी साजरा होणार आहे. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पंचमीला मोठ्याप्रमाणावर जुगार खेळला जातो. त्यासाठी गावमध्ये मोठी गर्दी होत असते. परंतु जनता कोरोनामुळे हा जुगार कसा खेळला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या संसर्गाने सर्वत्र हाहाकार उडाला असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अर्धापूर तालुक्यात २८ जणांचे स्वॅब घेतले. त्यापैकी तीन जण पॉझिटिव आले होते. उपचारानंतर तिघेही निगेटिव आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

हेही वाचा गुरुद्वारा बोर्डाचे दोन सदस्य का झाले निलंबित... वाचा सविस्तर

तालुक्यात अजून चार हजार ७८८ जणांना होमक्वारंटाईन

तालुक्यात अजून चार हजार ७८८ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ जरी झाली नाही तरी खबरदारी म्हणून प्रत्येकाने गर्दी करु नये. अर्धापूर पोलिसांनी तालुक्यात प्रवेश असलेल्या चारही ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी जागोजागी बंदोबस्त ठेवावा लागेल. कामाव्यतिरिक्त दुचाकी व चारचाकी मोठ्या प्रमाणावर फिरत असून पोलिसांनी अनेकांना चोप दिला आहे. नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. पण लगेच या जिल्ह्यातील हिंगोली. डोंगरकडा परिसरात सर्व खुले असल्याने अर्धापूर तालुक्यातील शॉपिंग डोंगरकडा परिसरात दररोज जाऊन शोक पूर्ण करून घेत आहेत.

नियमांचा भंग होण्याची शक्यता आहे

ता. २५ जुलैला नागपंचमी असल्याने त्या दिवशी नाग देवाचे पूजन करून झाडाला झोका खेळण्याचा आनंद तरुण, महिला, मुली घेत असतात. महिला शिराळ पूजा करतात पंचमीला दोन दिवस तालुक्यातील तालुक्यातील अर्धापूर, लहान, मालेगाव, कोंडा या गावात खुलेआम गावकरी व बाहेरची  मंडळी जुगार खेळतात. त्यामुळे या नियमांचा भंग होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. प्रशानाकडून नागपंचमीनिमित्त नागरिकांनी आपल्या घरी राहूनच सण साजारा करावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

येथे क्लिक करामुलाच्या डोळ्यासमोर बापाचा पाण्यात बुडून.....

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भाजीपाला, दूध, डाळी, सकस आहार घ्या

तहसीलदार सुजीत नरहरे यांनी व्यापारी, किराणा दुकानदार, हॉटेल मालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. पोलीस यंत्रणाही आपले कर्तव्य बजावत आहे. महिलांनी जास्त उपवास न करता रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भाजीपाला, दूध, डाळी, सकस आहारावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची गरज आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. ज्यांना ताप, सर्दी व अन्य त्रास जाणवत असतील तर त्यांनी शहरातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहात जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.