esakal | कोरोना बाधिताचे प्रमाण केवळ सहा टक्के ; शनिवारी १८९ रुग्ण कोरोनामुक्त ः ७६ जण पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शनिवारी (ता.२४) एक हजार ४६६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात केवळ ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १८ हजार ६५२ इतकी झाली आहे.

कोरोना बाधिताचे प्रमाण केवळ सहा टक्के ; शनिवारी १८९ रुग्ण कोरोनामुक्त ः ७६ जण पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोनामुळे दसरा- दिवाळी कशी होणार असा सर्वांनाच प्रश्‍न पडला होता. मात्र दिवाळीपूर्वीच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. उपचारानंतर ९६ टक्क्यापेक्षा अधिक बाधित कोरोनामुक्त झाल्याने, सध्यास्थितीमध्ये सहा टक्के इतक्याच कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी (ता.२४) एकाचा मृत्यू, ७६ जण पॉझिटिव्ह, तर १८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

शुक्रवारी (ता.२३) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शनिवारी (ता.२४) एक हजार ४६६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात केवळ ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १८ हजार ६५२ इतकी झाली आहे. श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सिडको येथील पुरुष (वय ६६) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ४९९ कोरोना बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- नांदेडमध्ये वाळूची तस्करी करणारा टिप्पर उलटला, दहा जण गंभीर जखमी

१७ हजार ९५ रुग्णांनी कोरोनावर मात

उपचारानंतर शनिवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील- पाच, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- पाच, पंचाब भवन, यात्री निवास, महसूल भवन आणि होम आयसोलेशन मधील १२७, मुखेड- दोन, नायगाव - तीन, किनवट- पाच, लोहा- एक, धर्माबाद- सहा, अर्धापूर- पाच, बिलोली- पाच व खासगी कोविड केअर सेंटरमधील २५ असे १८९ कोरोनाबाधित रुग्ण औषधोपचाराने पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालय आणि होम आयसोलेशनमधून कोरोना मुक्त घोषित करण्यात आले. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आतापर्यंत १७ हजार ९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केली आहे. 

हेही वाचले पाहिजे- जिल्ह्यातील २० टक्केच व्यापाऱ्यांकडे होलमार्क परवाना, मराठवाड्यात २०, २२ कॅरेटच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी ​

३८६ स्वॅबची तपासणी सुरू 

शनिवारच्या स्वॅब अहवालात नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात- ३५, नांदेड ग्रामीण- दोन, अर्धापूर-एक, लोहा-१०, देगलूर-एक, मुखेड-१०, उमरी- एक, भोकर- दोन, बिलोली- दोन, नायगाव- एक, मुदखेड- एक, हदगाव- एक, कंधार- एक, किनवट- तीन, हिंगोली- एक, परभणी- दोन, अकोला- एक, उत्तरप्रदेश- एक असे ७६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १८ हजार ६५२ वर पोहचला आहे. सध्या ९२९ कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून एकाही रुग्णांस कोरोनाचे गंभीर लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ३८६ स्वॅबची तपासणी सुरू होती. 

कोरोना मीटर- 

शनिवारी पॉझिटिव्ह- ७६ 
शनिवारी कोरोनामुक्त- १८९ 
शनिवारी मृत्यू- एक 
एकूण पॉझिटिव्ह - १८ हजार ६५२ 
एकूण कोरोनामुक्त- १७ हजार ९५ 
एकूण मृत्यू- ४९९ 
उपचार सुरू- ९२९ 
स्वॅब अहवाल प्रतिक्षेत- ३८६