कोरोनाने केला होळीचा बेरंग; अबालवृद्धांच्या आनंदावर लाॅकडाऊन

file photo
file photo

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : होळी, रंगोत्सवाची ओढ अबालवृद्धांना लागलेली असते. खास करुन बच्चे कंपनी तर आतूरतेने या उत्साहाची वाट पाहत आसते. पण यंदा या सणांचा कोरोनाने बेरंग करुन टाकला आहे. आनंदाच्या विविध रंगांची उधळण, स्नेही जणांना शुभेच्छा, साखरेची गोड गाडीची भेट, मित्र, मैत्रिणीचा सहवास आदींना यंदा कोरोनामुळे मुकावे लागत आहे. निसर्गाने जरी वसंताची चाहूल दिली आसली तरी सर्व आनंदाला कोरोनाने लाॅकडाऊन केले आहे. यंदाच्या होळीत कोरोनाचा विषाणू जळून जाऊन चांगल्या आरोग्याच्या रंगाची पुन्हा उधळण व्हावी ही प्रार्थना घरोघरी केली जात आहे.

होळी व रंगोत्सव हा भारतीय संस्कृतीमधील वर्षाचा शेवटचा सण. या सणानंतर चैत्र शुध्द प्रतिप्रदेला गुडीपाडवा सण केला जात. येथून नवीन वर्प सुरूवात होते. त्यामुळे वर्षाच्या शेवटी येणा-या होळी व रंगोत्सवाला विशेष आसे महत्व आहे. तसेच निसर्ग ही विविध फळ फुलांनी नटायला सुरुवात करतो. तसेच वसंत ऋतुची चाहूल लागलेली आसते.

होळी व रंगोत्सव दोन या दोन सणांची ओढ सर्वांनाच असते. होळीला पुरणपोळी हमखास केली जाते. तसेच होळीत वाईट विचार, सवयी, चालीरिती जाळून एका नव्या आदर्श विचारांनी जीवन जगण्याची धडपड करणे आवश्यक झाले आहे. रंगोत्सव हा तर सर्वांना आपला वाटणारा उत्सव. विविध रंगांची मुक्तपणे उधळण करुन आनंदाच्या रंगात एकरुप होण्यासाठी सर्वच आतूर झालेले असतात. जाती- धर्म, लहान मोठा या सर्व भिंती तोडून आपण सारे एक आहोत या भावनेतून रंगोत्सव साजरा केला जातो. आजच्या काळात एकमेकांपासून मानवाला दुर नेणा-या विचारांना होळीत जाळून एका आनंदाच्या रंगात रंगून जाण्याचा संदेश हा सण देतो.

गेल्या वर्षापासून मानवाला कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हात कडक लाॅकडाऊन सुरु आहे. जीवनातील सर्व आनंदाला कोरोनाने लाॅकडाऊन केले आहे. आनंदाची व रंगाची उधळण यंदा करता येणार नाही गेल्या. वर्षभरात सर्वच सण, उत्सव साजरे करता आले नाहीत. सर सलामत तो पगडी पचास असे म्हंटले जाते. ते सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरे ठरत आहे. यंदा जरी लाॅकडाऊन असले तरी पुढील वर्षी राहणार नाही तेव्हा आपण रंगोत्सव साजरा करण्यासाठी सुखरुप राहणे आवश्यक आहे. पुढील वर्षी विविध रंगांची मुक्तपणे उधळण करून रंगोत्सव साजरा करण्यासाठी सध्यातरी लाॅकडाऊनचे सर्व नियम पाळणे हेच खरे असे म्हणावे लागत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com