नांदेडात कोरोनाचे तांडव : शनिवारी ९४ बाधीत, सात रुग्ण बरे, एकाचा मृत्यू, संख्या पोहचली ८६९ वर

प्रल्हाद कांबळे
Saturday, 18 July 2020

अहवालात एकूण ३५९ अहवालापैकी २५४ अहवाल निगेटिव्ह तर ९४ कोरोना बाधीत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८६९ एवढी झाली आहे. यातील ४७६ बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे

नांदेड : नांदेड जिल्ह्यात शनिवार (ता. १८) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ९४ व्यक्ती बाधित तर एका बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. 
आजच्या अहवालात एकूण ३५९ अहवालापैकी २५४ अहवाल निगेटिव्ह तर ९४ कोरोना बाधीत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८६९ एवढी झाली आहे. यातील ४७६ बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ह्या तपासण्या आरटीपीसीआर व अॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे करण्यात आल्या.

आज १८ जुलै रोजी सात बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. नायगाव कोविड केअर सेंटर येथील दोन, डॉ. शंकरराव   चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील दोन बाधित, जिल्हा रुग्णालयातील एक व संदर्भीत झालेले दोन बाधित असे एकुण सात बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
 
एका बाधीत पुरुषांचा मृत्यू

मंगळवार १८ जुलै रोजी रात्री विष्णुनगर नांदेड येथील ६७ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या ४४ एवढी झाली 
आहे.

हेही वाचा विशेष स्टोरी : रक्ताच्या पलीकडील नाते कोणते ते वाचा...?
 
या भागातील रुग्ण बाधीत

नवीन बाधितांमध्ये नांदेडच्या प्रेमनगर दोन, सरपंचनगर तीन, प्रकाश नगर सात, चैतन्यनगर एक, नंदनवन काॅलनी तीन, शक्तीनगर एक, आसरा नगर एक, सांगवी आॅफीस रेल्वे काॅलनी एक, मधुबन रेसिडेन्सी नांदेड चार, विष्णुनगर तीन, सराफा सहा, देगलूर नाका दोन, एतवारा एक, रहेमतनगर एक, जुना कौठा एक, जुना मोंढा एक, स्नेहनगर एक, सोमेश काॅलनी एक, गणराजनगर एक, पांडूरंगनगर एक, सिडको एक, हैदरबाग दोन, पिरपुऱ्हानगर एक, सरपंतचनगर दोन, विष्णुनगर पाच, आदर्शनगर एक, सराफा नांदेड सहा, शिवकृपा काॅलनी एक, स्वामी विवेकानंदनगर एक, काबरानगर    एक, गोकुळनगर एक, साईनगर एक, वजिराबाद पाच, फरांदेनगर एक, विष्णुपूरी एक, विसावानगर नांदेड, देगलूर एक, उपजिल्हा रुग्णालय देगलुर     एक, नाथनगर देगलूर एक, कंधार एक, बामणी मुखेड सहा, मुक्रमाबाद चार, अशोकनगर मुखेड दोन, सिध्दार्थनगर किनवट एक, एसव्हीएम काॅलनी किनवट एक, एकता नगर किनवट एक, हिप्परगा ता. नायगाव एक, कळमुनरी एक, वसमत एक, जिंतुर एक, गंगाखेड एक, धुळे एक, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय परिसर एक, परळी एक, आज रोजी 377 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी (ता. १८) ३४९ पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील २७ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात १४ महिला बाधित व १३ पुरुष बाधित आहेत. 

बाधितांवर येथे आहेत उपचार

आज रोजी एकुण ८६९ बाधितांपैकी ४४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ९९, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ९३, मुखेड कोविड केअर सेंटर येथे २९, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, जिल्हा रुग्णालय येथे १९, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १२, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे पाच, गोकुंदा किनवट कोविड केअर सेंटर येथे दोन, हदगाव कोविड     केअर सेंटर येथे एक, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १८ बाधित, माहूर कोविड केअर सेंटर एक, लोहा दोन, कंधार दोन, धर्माबाद तीन, नांदेड           शहरातील खाजगी रुग्णालयात ४४ बाधित व्यक्ती उपचार घेत असून सहा बाधित औरंगाबाद येथे संदर्भित सहा, निझामबाद एक आहेत.

येथे क्लिक कराअर्रारर : कोरोना तपासणी प्रयोगशाळेतच कोरोनाचा शिरकाव

कोरोना मिटर

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार २०१,
घेतलेले स्वॅब- ९ हजार ८२६,
निगेटिव्ह स्वॅब- ७ हजार ८७३
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-९४
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ८६९,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- ८,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- ३,
मृत्यू संख्या- ४४,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ४७६,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ३४९,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या४०७ एवढी संख्या आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona in Nanded: 94 infected, seven cured, one killed, death toll rises to 869 nanded news