कोरोना संकट छे...! नांदेडकर बिनधास्त, भयमुक्त...

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 12 August 2020

मार्चमध्ये कोरोनाची भीती संपूर्ण जगात निर्माण झाली होती. महाराष्ट्रात आणि देशात त्या वेळी कोरोना पोहचला नसताना नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. मात्र आजघडीला नांदेडची रुग्णसंख्या ही साडेतीन हजारावर पोहचली. सव्वाशेहून अधिक जणांचा बळी गेला. तरीही याच्याबद्दल आता नागरिक भयमुक्त झाल्याचे दिसुन येतात

नांदेड : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता आजही अनेकांना धक्का बसत आहे. मात्र काही मंडळी कोरोना संकट छे...! असे म्हणत चक्क सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. शहरात कुठेच शारिरीक अंतर किंवा मास्क व लॉकडाउनचा नियम पाळल्या जात नसल्याचे चित्र आहे. मार्चमध्ये कोरोनाची भीती संपूर्ण जगात निर्माण झाली होती. महाराष्ट्रात आणि देशात त्या वेळी कोरोना पोहचला नसताना नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. मात्र आजघडीला नांदेडची रुग्णसंख्या ही साडेतीन हजारावर पोहचली. सव्वाशेहून अधिक जणांचा बळी गेला. तरीही याच्याबद्दल आता नागरिक भयमुक्त झाल्याचे दिसुन येतात. मात्र संकट टळले नसल्याचे प्रशासन दररोज सांगत असून आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. परंतु त्या आवाहनाला नागरिक ठेंगा दाखवत आहेत. 

कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला असतानाही नागरिकांना जराही भीती राहिली नाही. देशभरात व राज्यात कोरोनामुळे हजारोंचा बळी गेला आहे. सुरवातीला नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यामुळे कोरोनाला जगातील प्रत्येक राष्ट्राने अत्यंत गांभीर्याने घेतले होते. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांचे रक्षण करण्यासाठी अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या. भारतातील प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने लॉकडाऊन करण्यात आले होते.

हेही वाचाधक्कादायक : पतीचा अपघातात मृत्यू, मात्र घडले भलतेच, काय आहे प्रकरण वाचा...

पीरबुर्‍हाणनगर येथे ६४ वर्षीय पहिला रुग्ण 

अगदी प्रारंभीच्या काळात कोरोना संसर्गाची इतकी दहशत निर्माण झाली होती. कोरोनाचे नाव उच्चारताच अनेकांना भीती वाटायची. त्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी कमी होती. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नांदेड शहरातील पीरबुर्‍हाणनगर येथे ६४ वर्षीय पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली होती. महापालिका व पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाने पीरबुर्‍हाणनगर परिसर तीन किलोमीटरपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. एवढी दहशत होती की, त्या परिसरातून जाण्यासही नागरिक घाबरत होते. 

प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न 

जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत होते. पोलिस विभागाकडून कडक बंदोबस्त लावून मुख्य चौका- चौकात रस्ते बंद करण्यात आले होते. त्यावेळी नागिरक रस्त्यावर येण्यास भित होते. परंतु आजच्या परिस्थितीत जिल्ह्यातील रुग्ण संख्या साडेतीन हजारांवर जाऊन पोहोचली आहे. नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती राहिली नाही. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे प्रशासन संदेश देत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य नागरिकही या आजाराच्या बाबतीत आता फारसे गंभीर राहिले नाहीत असे चित्र दिसून येत आहे.

येथे क्लिक कराशेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : पोस्ट बँक शेतकऱ्यांच्या बांधावर

कोरोनाच्या दहशतीवर मात 

सरकारने लागू केलेला लॉकडाउन जवळ- जवळ चार महिने राहिला. या काळातील तीन टप्प्यात देशातील हातावर पोट असणारे, गोरगरीब आणि सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या. मात्र त्या सर्वसामान्य माणूस जगविण्यासाठी अपुऱ्या होत्या. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक जगण्याच्या भीतीने कोरोनाच्या दहशतीवर मात केल्याचे काही नागरिक बोलुन दाखवितात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona- Nandedkar without fear, free from fear nanded news