दुसऱ्या दिवशी कोरोना स्वॅब चाचणी बंद, नाना नानी पार्क मारहाण प्रकरण, प्रशासनाची बघ्याची भूमिका

शिवचरण वावळे
Thursday, 4 February 2021

कोरोना हा आजार सर्वांसाठी नवा होता. मागील आठ ते दहा महिण्यापर्यंत या आजारावर कुठलेही लस वा औषध उपलब्ध नव्हते, अशा विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःच्या जिवाची बाजी लावून दिवस रात्र रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आशा, अंगणवाडी सेविका, लॅब टेक्निशिएन यांच्या कामाला सलाम म्हणून त्यांच्यावर कुठे फुलांचा वर्षाव झाला, तर कुठे कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान झाला. याच कोरोना काळात संबंध जगाने डॉक्टरांच्या रुपात साक्षात देवच बघितला.  मात्र याच डॉक्टर, कर्मचारी यांच्यावर फुलांच्या वर्षावा ऐवजी थापडा खाण्याची वेळ येत आहे. 

नांदेड - नाना नानी पार्क येथे असलेल्या कोरोना स्वॅब चाचणी सेंटरमध्ये घुसुन बुधवारी (ता. तीन) सकाळी एका व्यक्तीने त्याच्या साथीदारासह तेथील डॉक्टर व कर्मचारी यांना मारहण केली होती. घाबरलेले १५ डॉक्टर, टेक्नीशियन व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन करत महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे नाना नानी पार्क स्वॅब चाचणी सेंटरवर सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे.

त्यावर प्रशासनाकडून अद्याप कुठलीही हालचाल केली नसल्याने  डाॅक्कटर , कर्मचारी यांनी सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. चार) स्वॅब चाचणी केंद्र बंद ठेवले. त्यामुळे दोन दिवसापासून नाना नानी पार्क येथे एकही व्यक्तीची स्वॅब चाचणी झाली नाही. स्वतःहून कोरोना चाचणी करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरीकांना श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय व विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत होती.

हेही वाचा- नांदेडच्या सांगवीमध्ये चोरट्यांनी चार दुकाने फोडले; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

फुलांच्या वर्षावा ऐवजी थापडा खाण्याची वेळ

कोरोना हा आजार सर्वांसाठी नवा होता. मागील आठ ते दहा महिण्यापर्यंत या आजारावर कुठलेही लस वा औषध उपलब्ध नव्हते, अशा विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःच्या जिवाची बाजी लावून दिवस रात्र रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आशा, अंगणवाडी सेविका, लॅब टेक्निशिएन यांच्या कामाला सलाम म्हणून त्यांच्यावर कुठे फुलांचा वर्षाव झाला, तर कुठे कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान झाला. याच कोरोना काळात संबंध जगाने डॉक्टरांच्या रुपात साक्षात देवच बघितला.  मात्र याच डॉक्टर, कर्मचारी यांच्यावर फुलांच्या वर्षावा ऐवजी थापडा खाण्याची वेळ येत आहे. 

हेही वाचा- नांदेडमधील धक्कादायक घटना : देगलूर नाका परिसरात सहा तास बांधून दोघांना बेदम मारहाण; पाच जणांना पोलिस कोठडी

प्रशासन नेमकी काय भुमिका घेणार?

त्यामुळे नाना नानी पार्क स्वॅब चाचणी सेंटरवर प्रशासनाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक कधी होणार, कोरोना योद्धे म्हणून पुष्पवृष्टी करण्यात येणाऱ्या डॉक्टरांची दमदाटी, मारहाण थांबविण्यासाठी प्रशासन नेमकी काय भुमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona swab test closed the next day Nana Nani Park assault case, the role of the administration