मराठवाडा पदवीधर निवडणूक लढवणार- मेस्टा

प्रल्हाद कांबळे
Friday, 16 October 2020

मराठवाड्यातील पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हे सर्व गतकाळातील आमचेच विद्यार्थी आहेत

नांदेड : महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना (मेस्टा) ने मराठवाडा पदवीधर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे.मराठवाड्यातील पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हे सर्व गतकाळातील आमचेच विद्यार्थी आहेत. यांना कोणीच वाली उरला नाही यांच्या वरील अन्याला वाचा फोडण्यासाठी व मराठवाड्यातील विद्यार्थी पालक तसेच 5000 इंग्रजी मराठी उर्दू शाळांच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षक व बी एड संघटना यांनी अथक परिश्रम घेऊन मिळून गेल्या वर्षभरात (70000) सत्तर हजार पदवीधर मतदार नोंदणी केली या  बळावर. सर्व क्षेत्रातील संघटना. सोबत घेऊन ही निवडणूक लढत आहोत. नांदेड येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. तायडे पाटील सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. प्रत्येक जिल्हयात जाऊन ते याबाबत संवाद साधत आहेत. 

आपल्या कार्यकाळात ज्यांच्या मतांवर आपण निवडून आलो. त्यांच्या अडीअडचणी बद्दल गेल्या बारा वर्षात एक अवाक्षर बोलले नाही किंवा एकही समस्या सोडवल्याचे ऐकिवात देखील नाही. शिक्षण खात्यातील भोंगळ कारभार तर मागील सरकार च्या काळातील असो की या सरकारच्या काळातील असो  आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या क्षेत्रात तर गेल्या अनेक वर्षांपासून संघटना सर्व स्तरातील घटकांना न्याय मिळवून देण्याचं कामं करत आली मग आर्थिक दुर्बल घटकातील गरीब विद्यार्थी यांना मध्यांन्ह भोजन असो की त्यांचे गणवेश दप्तराची  मागणी असो. 

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : वजनकाट्यातून होतेय ग्राहकांची आर्थिक फसगत

रोजगार थांबले, नोकऱ्या गेल्या. उद्योग धंदे बंद पडले

कोविड 19 महामारीच्या काळात सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. अनेकांचे रोजगार थांबले, नोकऱ्या गेल्या. उद्योग धंदे बंद पडले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, मायबाप सरकार तर सोडाच परंतु हे आमचे मराठवाड्याचे नेते कुठेच दिसलें नाही. सरकाने कोणतीही शैक्षणिक सुविधा न पुरवतात ऑनलाईन शिक्षणाच्या पोकळ गप्पा मारल्या एकही अनुदानित किंवा सरकारी शाळेतील विद्यार्थी या वर्षी शिकेलाच नाही. विनाअनुदानित इंग्रजी मराठी उर्दू शाळेंतील शिक्षकांचे संसार उघड्यावर आले. त्यांच्या कुटुंबांची अक्षरशः उपासमार झाली.

पदवीधरांचा आमदार हा पदवीधर असला पाहिजे कोणी ठेकेदार नाही

काही शिक्षकांनी जगण्यासाठी भाजीपाला विकला, वडापाव च्या गाड्या लावल्या, हातगाड्यावर सानिटायझर विकले, तर काही मी चिप्स बनवले काहींनी खेळणे विकण्याचा धंदा केला कोळी रंगकाम केले कुणी धान्य विक्री केली पेंटिंग करून आपल्या संसाराचा गाडा ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अनेकांचे हकनाक बळी गेले सरकार कडून साधी मदतीची मागणी ना पदवीधर आमदाराने केली ना शिक्षक आमदाराने केली की ज्यांना निवडणूक लढवायची त्या इच्छुकांनी केली. या सर्वांनी आमची साथ सोडली. उद्या येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करून घ्यावी याचा अभ्यास हे आमदारांना नाहीत. म्हणून पदवीधरांचा आमदार हा पदवीधर असला पाहिजे कोणी ठेकेदार नाही. 

येथे क्लिक करा - नांदेडला कॉँग्रेसच्या व्हर्च्युअल रॅलीत शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी

नोकरी नाही म्हणून लग्न जुळत नाहीत

 शिक्षकांचे हाल सुरू आहेत वकिलांच्या अनेक समस्या आहेत डॉक्टर सुरक्षित नाहीत. त्यांना रोज या ना त्या कारणाने मारहाण केली जाते. इंजिनीयर बेकार फिरताय. बीएड पदवीधर बेकार फिरत आहेत. औरंगाबादसारखे औद्योगिक क्षेत्रात 400 कारखाने असून मराठवाड्यातील एकही पदवीधर तिथे नोकरीला नाही. मराठवाड्यातील तरुणांना 35- 35 वर्षे वय झाले तरी त्यांची नोकरी नाही म्हणून लग्न जुळत नाहीत. असे अनेक ज्वलंत प्रश्न मराठवाड्यात असतांना यासंदर्भात गेल्या बारा वर्षापासून विधान परिषदेमध्ये तरीदेखील या आमदारांनी एक शब्द देखील काढला नाही. कधी कुणाच्या शाळेवर, एखाद्या कोर्टात किंवा दवाखान्यात जाऊन या त्रासलेल्या शिक्षकाची वकिलाची व डॉक्टरांची साधी विचार पूस केली नाही.

आठ दिवसात त्यांच्या मुलाखती घेऊन यादी जाहीर केली जाईल

मराठवाड्यातील मूळ प्रश्नांना फाट्यावर मारत फक्त पदवीधरांची मत लाटत हजारो कोटीची माया यांनी जमा केली. कोणी अडचण मांडायला गेलाच तर त्याला दादागिरी ही भाषा वापरत गप्प केले गेले. म्हणून आता बस्स झालं भूतकाळात आम्ही ज्यांना डॉक्टर वकील इंजिनिअर शिक्षक बनवलं त्या आमच्या माजी विद्यार्थ्यांचे हाल आता पहावत नाही. आणि म्हणूनच मेस्टा आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना व सर्व सामाजिक संघटनांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक सर्व दिशेने ताकदीनिशी लाढवणार आहे. मेस्टाकडे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या व वेगवेगळ्या स्तरातील नेत्यांनी उमेदवारी मागितली आहे. येत्या आठ दिवसात त्यांच्या मुलाखती घेऊन यादी जाहीर केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada graduates to contest elections: Mesta nanded news