esakal | कोरोनाच्या चाचण्या आजपासून शासकीय रुग्णालयात
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

प्रयोग शाळेवरचा ताण वाढला आणि जिल्ह्यात प्रयोगशाळा असताना पुन्हा स्वॅब अहवालास विलंब होणे सुरु झाले. त्यामुळे आज पाठविलेले स्वॅब अहवाल प्राप्त होण्यात दोन दिवसापर्यंत विलंब होत होता. 

कोरोनाच्या चाचण्या आजपासून शासकीय रुग्णालयात

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे रोज नवे रुग्ण वाढत होते. सुरुवातीस स्वॅब घेतलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे व त्यानंतर अंतर कमी व्हावे म्हणून औरंगाबादच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात येत असत. त्यामुळे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब सुरु झाली. यामुळे पुणे, औरंगाबादचा प्रवास थांबला होता. 

पुणे - औरंगाबादच्या प्रयोग शाळेप्रमाणेच नांदेडच्या प्रयोगशाळेत, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील स्वॅब तपासणी अहवाल तपासणीसाठी येत आहेत. यामुळे प्रयोग शाळेवरचा ताण वाढला आणि जिल्ह्यात प्रयोगशाळा असताना पुन्हा स्वॅब अहवालास विलंब होणे सुरु झाले. त्यामुळे आज पाठविलेले स्वॅब अहवाल प्राप्त होण्यात दोन दिवसापर्यंत विलंब होत होता. 

हेही वाचा- नांदेडात आजही कोरोनाने घेतला दोघांचा बळी, एक पॉझिटिव्ह

 ​यांच्या प्रयत्नाला यश

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी डीपीडीसीच्या निधीतून विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यातील दुसरी कोरोना चाचणी लॅब (प्रयोगशाळा) सुरु करण्यासाठी निधीची तरतूद केली व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, डॉ. संजय मुखर्जी, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मदतीने प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. 

हेही वाचा- लॉकडाउन: तब्बल 80 दिवसांनी हैद्राबाद- नांदेड- मुंबई विमानसेवा सुरु ​

चार तासात मिळणार अहवाल

विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात गुरुवारी (ता. ११) ही प्रयोग शाळा सुरु झाली असली तरी, प्रत्यक्षात शुक्रवारपासून (ता.१२) ही प्रयोग शाळा अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या देखरेखीखाली सुरु करण्यात आली आहे. या प्रयोग शाळेचे समन्वयक म्हणून डॉ. संजय मोरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह हिंगोली आणि परभणी येथील स्वॅब चाचणी अहवाल अगदी काही तासात मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. शिवाय प्रयोग शाळेवरील चाचणी करण्याचा ताण हलका होणार आहे. 

रोज किमान शंभर स्वॅब टेस्ट करणे शक्य
जिल्ह्यात दुसरी कोरोना टेस्ट लॅब विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु होण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केल्याने ते शक्य झाले आहे. प्रयोगशाळा आजपासून प्रत्यक्षात सुरु होणार असून, रोज किमान शंभर स्वॅब टेस्ट करणे शक्य होईल. शिवाय मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास ही प्रयोगशाळा दोन ते तीन शिफ्टमध्ये देखील चालवणे शक्य होईल. 
- डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता.