कोरोना उपचार : बारडच्या रुपेश देशमुख यांना कोवी शील्डचा पहिला डोस

प्रताप देशमुख
Friday, 28 August 2020

सिरम कोरोना लस मानवी चाचणीचा श्रीगणेशा; २८ दिवसानंतर दुसरा डोस 

बारड (जिल्हा नांदेड) - सिरम इन्स्टिट्यूटच्या कोवी शिल्ड लसीची परदेशात पहिली मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारतात या लसीचा दुसर्‍या आणि तिसर्‍या मानवी चाचणी चा टप्पा सुरू झाला आहे. भारती विद्यापीठाच्या रूग्णालयात दोन स्वयंसेवकाला अर्धा मिली लसीचा डोस देऊन चाचणी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बारड या गावातील रुपेश बाळासाहेब देशमुख या युवकाला कोवि शिल्ड चा डोस देऊन मानवी चाचणी लसीचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्रोजीनीको यांच्या संयुक्त सहभागातून कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ अंतर्गत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ता.२६(बुधवार) दोन स्वयंसेवकाला कोवीशील्ड लसीचा डोस देण्यात आला. या लसीच्या मानवी चाचणीसाठी पाच निरोगी स्वयंसेवकांनी नाव नोंदणी केली होती त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश होता.

हेही वाचानीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी- पालकमंत्री अशोक चव्हाण -

28 दिवसानंतर या युवकांवर दुसरा डोस देण्यात येणार आहे

निवडण्यात आलेल्या सर्व स्वयंसेवकांची खबरदारी म्हणून कोविंड rt-pcr चाचणी तसेच अँटीबॉडी तपासणी करण्यात आली होती. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना कोरणा लसीचा डोस देण्यात आला आहे. मानवी चाचणीच्या पहिला डोसानंतर साईड इफेक्ट काय होतात याची तपासणी 28 दिवसाचा कालावधी लागणार आहे. 28 दिवसानंतर या युवकांवर दुसरा डोस देण्यात येणार आहे. यावेळी भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन च्या कार्यकारी संचालिका अस्मिता कदम, डॉक्टर संजय ललवाणी, डॉक्टर सोनाली पालकर, डॉक्टर जितेंद्र ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

येथे क्लिक करा - एक जानेवारीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार! कोण म्हणाले वाचाच.... -

मानवी चाचणीसाठी माझी निवड अभिमानास्पद आहे.

संपूर्ण जगाला कोरोणा संसर्गजन्य महामारी ने ग्रासले असताना सर्वांचे लक्ष कोरोना लसीच्या शोधाकडे लागले आहे. कोरोना लस मानवी चाचणीचा श्रीगणेशा पुण्यात झाला असल्याने सिरम कोविड शील्ड डोस साठी माझी निवड अभिमानास्पद आहे. देशाच्या सामाजिक कार्यात सहभागी होत असताना स्वयंसेवक पाहिजे अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समजली. याबाबत मी कुटुंबाशी चर्चा केली. कुटुंब परिवाराने या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले यानंतर मी भारतीय विद्यापीठाअंतर्गत रुग्णालयात संपर्क साधला माझा स्वाब आणि अँटीबॉडी ची तपासणी करण्यात आली. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर मला लस चा पहिला डोस देण्यात आला. हे माझे भाग्य समजतो. नागरिकांनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

- रुपेश देशमुख

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona treatment: The first dose of Kovi Shield to Barad's Rupesh Deshmukh nanded news