esakal | नांदेडमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता..!
sakal

बोलून बातमी शोधा

nanded corona

नांदेडमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: कोरोना संसर्गाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनातंर्गत जिल्ह्यात हंगामी स्वरुपात एक हजार ३५० आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभावना वर्तविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे तर दुसरीकडे कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनाही कामाची प्रतिक्षा आहे.

कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा अपुरे मनुष्यबळ, कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांचा अभाव, पुरातन आरोग्य साहित्य यंत्रणा अशा स्थितीत कोरोना लाटेला सामोरे जावे लागले. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीच आरोग्य विभागाने मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्याच्या ठिकाणी हंगामी काळासाठी विविध पदाच्या जागा भरल्या. जिल्ह्यात एक हजार तीनशे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. यासाठी त्यांना बारा हजारापासून ते ६० हजार रुपयापर्यंत मानधन दिले. त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले होते. जोखीमेच्या काळात हातात पैसे आल्याने अनेकांना समाधानही होते.

हेही वाचा: NEET Exam: नांदेडमध्ये रविवारी ३५ केंद्रावर होणार परीक्षा

सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बोटावर मोजण्याइतकेच शिल्लक आहेत. त्यामुळे कोरोना चाचणी करणारे लॅब टेक्नीशियन व स्वॅब घेणारे कर्मचारी सोडले तर सर्वांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. जिल्ह्यात तिसरी लाट येऊ नये असे प्रशासनाला वाटत असले तरी, कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतिक्षा लागली आहे. तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरु केली आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता मध्यम की सौम्य स्वरुपाची असेल या बद्दल अनेक तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे तिसरी लाट येणार हे निश्‍चित असले तरी, कामावरुन कमी केलेल्या किती कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावले जाईल हे आताच सांगता येणार नाही.

हेही वाचा: Hingoli Rain: सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; बारा दरवाजे उघडले

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येऊच नये, आली तरी तिचे स्वरुप तीव्र नसावे. कोरोना काळात अनेकांना जवळच्या व्यक्तीला गमवावे लागले आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. यदा कदाचीत तिसरी लाट आली तरी त्यास तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी सर्व ती तयारी केली जात आहे.

-डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक.

loading image
go to top