कोरोना यौद्धा : कोरोनावर मात करुन प्लाझ्मा दानातून दोघांना जीवदान 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 3 October 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या वाढदिवसानिमत्त त्यांनी व इतर चार जणांनी प्लाझ्मा दान करुन समाजापुढे नवा आदर्श ठेवला. विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात प्लाझ्मा सेंटरवर जावून कोरोनायौध्यांनी प्लाझ्मा दान करावे आसे आवाहनही या दात्यांनी केले

नांदेड : समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून येथील राज्य उत्पादन शुल्कमध्ये कार्यरत दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार यांनी कोरोनावर मात तर केलीच उलट आपला प्लाझ्मा दान करुन दोन गंभीर कोरोना रुग्णांचा जीव वाचवला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या वाढदिवसानिमत्त त्यांनी व इतर चार जणांनी प्लाझ्मा दान करुन समाजापुढे नवा आदर्श ठेवला. विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात प्लाझ्मा सेंटरवर जावून कोरोनायौध्यांनी प्लाझ्मा दान करावे आसे आवाहनही या दात्यांनी केले.

कोरोनामुळे वाढता मृत्युदर आला रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. दररोज पाच ते दहाच्या दरम्यान कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. आज घडीला चारशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू थांबवायचे असतील तर प्लाजमा थेरपी वरदान ठरत आहे. आतापर्यंत मृत्यूच्या दाढेत पोहोचलेले दहाजण प्लाझ्मा थेरपीमुळे ठणठणीत झाल्या आहेत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीची संख्या वाढविण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने कोरोनामुक्त झालेल्या काही दात्यांची यादी तयार केली आहे. येत्या काही दिवसात हे दाते आपला प्लाझ्मा दान करणार आहेत.

हेही वाचागुड न्यूज : मराठवाड्यातून तीन रेल्वे धावणार, प्रवाशांना दिलासा -

रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तब्बल ८० टक्के 

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तब्बल ८० टक्के एवढे आहे. तर चारशेहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ५० वर्ष वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक असली तरी सर्वच वयोगटातील रुग्णांनाही कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी केल्यास त्याचा जीव वाचू शकतो. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आतापर्यंत वीस जणांनी आपला प्लाझ्मा दान केले आहे.
त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार, पोलिस अर्जून मुंडे, हॉटेल व्यावसायीक मुन्ना जैन यांचा समावेश आहे. 

येथे क्लिक करा - अपघाताला निमंत्रणः लोखंडी खांबावरून केली जातेय नदीपार

प्लाझ्मा थेरपी वाढविण्यासाठी प्रयत्न 

कोरोनामुक्त झाल्यानंतर २८ दिवसानंतर आपला प्लाझ्मा दान करता येतो. परंतु तो व्यक्ती ठणठणीत असण्याची गरज आहे. प्लाझ्मा घेण्यापूर्वी त्याची बॉडी तपासणी करण्यात येते. या तपासणीत ०.९ टक्क्यापेक्षा अधिक प्रमाण असल्यास त्या व्यक्तीचा प्लाझ्मा घेतला जातो. जिल्हाधिकारी डॉ. विपीन कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांची अँटीबॉडी केली असता त्यांचे प्रमाण २. ६७ इतके जबरदस्त होते. एका व्यक्तीकडून २०० एमएलच्या दोन बॅगा घेतल्या जातात. त्यामुळे दोन व्यक्तींचा जीव वाचू शकतो. खासगी रुग्णालयात जवळपास सात हजार रुपये आकारण्यात येतात. शासकीय रुग्णालयात मोफत करण्यात येते. रुग्णांना मिळणारा दिलासा या माध्यमातून उपचार करता येतात. प्लाझ्मा थेरपी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Warrior: Defeating Corona and donating plasma to save lives nanded news