esakal | आरोग्य सभापतीकडून कोरोना वॉरिअर्सचा सन्मान - कुठे ते वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

स्थानिक पातळीवरील कोरोना वॉरिअर्सचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य व अर्थ सभापती पद्मा नरसा रेड्डी यांनी शनिवार (ता.२७) धर्माबाद तालुक्यातील कोरोना वॉरिअर्सचा सुरक्षा किट देऊन सन्मान केला. 

आरोग्य सभापतीकडून कोरोना वॉरिअर्सचा सन्मान - कुठे ते वाचा 

sakal_logo
By
नवनाथ येवले

नांदेड: कोरोनाच्या संकटकाळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना वॉरिअर्सच्या कर्तव्यतत्परेतमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव नगन्य आहे. जिल्हाप्रशासनाच्या आदेशानुसार आशा वर्कर, आंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य कर्मचारी (महिला, पुरूष) आदी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन नागरीकांच्या तपासण्या केल्या. स्थानिक पातळीवरील कोरोना वॉरिअर्सचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य व अर्थ सभापती पद्मा नरसा रेड्डी यांनी शनिवार (ता.२७) धर्माबाद तालुक्यातील कोरोना वॉरिअर्सचा सुरक्षा किट देऊन सन्मान केला. 

 कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार लॉकडाउन कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात मागील महिन्यात मुंबई- पुणे यासह राज्याच्या इतर जिल्ह्यातून गावी परतलेल्या नागरिकांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्याने गावच्या नागरिकांनी त्यांच्याशी जुळून घेतले असले तरी कोरोनाची भिती मात्र कायम आहे. इतर जिल्ह्यातून गावी परतलेल्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी गावपातळीवर दक्षता समिती, कोरोना टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. आशा वर्कर, आंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, प्रतिष्ठीत नागरीकांच्या सहभागातील समित्यांनी चोख जाबाबदारी पार पाडली. 

हेही वाचा५६ दिवसानंतर सचखंड आणि लंगरसाहेब झोनमुक्त: गुरुद्वाराचे दर्शन खुले 
 
कोरोना बाधितांची वाढत्या संख्येमुळे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरीक, बालकांसह सरकसट महिला पुरूषांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. आरोग्य विभागामार्फत सरसकट नागरिकांच्या आरोग्य तपासण्यामुळे काही प्रमाणात भिती दूर झाली. त्यामुळे व्याधीग्रस्त नागरिकांसह इतर आजाराचे रुग्ण समोर आले, त्यातच काही प्रमाणात लक्षण आढळून येणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाची तीव्रता मंदावली आहे. याचे श्रेय नागरिकांसह कोरोना वॉरिअर्सला जात असल्याच्या भावनेतून सभापती पद्मा नरसारेड्डी यांनी कोरोना वॉरिअर्सचे मनोबल वाढवले.  

येथे क्लिक करा व्हीसीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद, काय म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. विपीन...?

संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या आशा वर्कर, आंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी,वैद्यकीय अधिकारी यांना करखेली (ता. धर्माबाद) येथील प्रामिक आरोग्य रुग्णालयास भेट देऊन सुरक्षा किट देऊन सन्मान केला. त्याचबरोबर रक्तदाब, मधुमेह आदी आजारांच्या रुग्णांची घरी जाऊन आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधी वाटप करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शिवसेनेचे धार्माबाद तालुकाप्रमुख आकाश रेड्डी, तालुका आरोग्य अधिकारी श्री. खंदारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. मोरे, दत्तारेड्डी सुरकुंटवर आदींची उपस्थिती होती.
 
 

loading image