File Photo
File Photo

कोरोना योद्घांना हवी विश्रांती... 

नांदेड : कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर नांदेडला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागाच्या वतीने ता. १२ मार्चपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर आपती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. गेल्या जवळपास तीन महिन्यापासून अविरतपणे प्रशासनाचे काम सुरु असल्यामुळे आता त्यांना देखील थोडीफार विश्रांतीची गरज आहे. 

कोरोनाच्या अनुषंगाने पूर्वतयारी व प्रत्‍यक्ष अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व जिल्हा परिषदेचे आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची संनियंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्‍ह्यातील सर्व विभागाकडून प्राप्‍त होणाऱ्या दैनंदिन अहवालाची एकत्रित माहिती जमा करण्यास सुरुवात झाली. 

जिल्हा परिषद, महापालिकेचे ही योदान

आरोग्य विभाग, महापालिका, शासकीय रुग्णालय, आयुर्वेदिक रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, आशावर्कर, सफाई कर्मचारी यांच्यासह महसुल विभाग, पोलिस, सामाजिक व स्वंयसेवी संस्था यांना मदतीला घेऊन जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारीका, आशा वर्कर, आरोग्य सेवक असे साडेपाच हजारापेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी यांना जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सुटी न घेता स्वतःला व कुटुंबाला सांभाळत खऱ्या अर्थाने कोरोना योद्धाची भूमिका बजावत आहेत. 

पोलीस विभागाचे योगदान

पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह महत्वाची भूमिका बजावली. संशयित रुग्‍णांच्यासाठी पोलीस व सेवाभावी संस्‍थेच्‍या माध्‍यमातून तपासण्या केल्या जात आहेत. याशिवाय आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात स्‍वतंत्र पूर्णवेळ वैद्यकीय पथक, जिल्ह्यातील विविध रुग्‍णालये व दवाखान्यांमध्ये कोरोनाच्या आजारांसाठी खाटांचे नियोजन, अधिनस्‍त अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन, औषधसाठ्याची माहिती, गर्दीच्‍या ठिकाणी जनजागृती, क्वॉरंटाईन आणि आयसोलेशन युनिटची स्‍थापना व यासाठी नोडल अधिकारी यांच्या नियु‍त्या, कोरोना विषाणुसंबंधी नियंत्रण कक्षाची स्‍थापना, जिल्‍हा आणि तालुकास्‍तरावर नियंत्रण कक्षाची स्‍थापना, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालयापासून ते गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत यंत्रणा उभारण्यात आली. तसेच इतर संबंधित विभागांवरही जबाबदारी सोपविण्यात आली. 


कोरोनाने खुप काही शिकवले 
रुग्ण कुठल्याही आजाराचा असो त्या रुग्णावर औषधोपचार करुन त्यास व्याधीमुक्त करणे, हा डॉक्टरांचा धर्मच आहे. कोरोना संसर्ग सर्वांसाठी नवीन असल्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून थोडीशी देखील उसंत मिळत नाही, हेही तितकेच खरे आहे. यासाठी घरच्या मंडळीची साथ लाभणे महत्वाचे आहे. स्वतःचे आरोग्य सांभाळून कुटुंब सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. ती कोरोनाने शिकवली आहे. 
- डॉ. बी. एम. शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com