esakal | कोरोना : नांदेडमध्ये ‘त्या’ महिलेचाही मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महिलेचा स्वॅब घेऊन तपासणी केली असता बुधवारी (ता.२९) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तिचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला.

कोरोना : नांदेडमध्ये ‘त्या’ महिलेचाही मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सेलू येथील एक पंचावन्न वर्षीय महिला विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी (ता.२९ एप्रिल २०२०) दाखल झाली होती. तिच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरु असताना गुरुवारी (ता.३०) रात्री १०.३० वाजता त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

२०१९ पासून औरंगाबाद येथे उपचार
ही महिला २०१९ पासून औरंगाबाद येथे उपचार घेत होती. परंतु सोमवारी (ता.२७ एप्रिल २०२०) सकाळी साडेचारच्या सुमारास ती महिला खासगी वाहनाने सेलूतील घरी दाखल झाली. मंगळवारी (ता.२८ एप्रिल २०२०) सकाळी साडे दहा वाजता परत औषधोपचार करण्यासाठी महिलेला परभणी येथे नेले होते. तेथेही तिच्यावर उपचार झाले नसल्याने तिला नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. येथे त्या महिलेचा स्वॅब घेऊन तपासणी केली असता बुधवारी (ता.२९) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तिचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला.

हेही वाचा Corona : रिपोर्ट निगेटिव्ह, पण नांदेडमध्ये रुग्णाचा मृत्यू

दरम्यान पीरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली होती. त्याचा सेकंड रिपोर्ट बुधवारी (ता.२९ एप्रिल) निगेटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील पहिला रुग्ण लवकरच कोरोनामुक्त होईल, असे वाटत असतानाच त्याचा गुरुवारी (ता.३० एप्रिल) दुपारी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.