esakal | कोरोनाचे सावट : अधिक मासात जावई मुकणार धोंड्याला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या काळातच अधिक मास आल्याने जावयांना धोंड्याच्या सणापासून दूर रहावे लागणार आहे. एकंदरीत नविन लग्न झालेल्या जावयांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

कोरोनाचे सावट : अधिक मासात जावई मुकणार धोंड्याला

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या देशावर व जगावर कोरोनाचे महाभंयकर संकट आलेले आहे. या संकटामुळे जगातील महासत्ता हतबल झाल्या असून अजूनही कोरोनावर प्रतिबंध करणारी लस शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार उडाला आहे. त्यातच कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या काळातच अधिक मास आल्याने जावयांना धोंड्याच्या सणापासून दूर रहावे लागणार आहे. एकंदरीत नविन लग्न झालेल्या जावयांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. अनेकांना तर साधे निमंत्रणसुद्धा देण्यात येत नसल्याने यावर्षी जावई धोंड्याला मुकणार आहे. 

प्रतिवर्षी पितृपंधरवडा संपताच नवरात्र सुरू होत असते. परंतु यावर्षी ता. १८ सप्टेंबर ते ता. १६ ऑक्टोबर या काळात अधिक मास आल्याने (पुरुषोत्तम मास) या मासाला सुरुवात झाली आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. हिंदू धर्मात याला फार महत्त्व आहे. मात्र यंदा अतिवृष्टीचे सावट दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने सर्व धार्मिक स्थळांना कुलूप ठोकल्याने भाविकात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे अधिक मासात जावयांना आमंत्रित करून धोंडे खाऊ घालण्याची परंपरा खंडित होण्याच्या मार्गावर आहे. नवीन लग्न झालेल्या तरुणी आणि जावयांना तीन वर्षानंतर आलेल्या अधिकमासाची ओढ लागली होती. परंतु कोरोना महामारीमुळे अनेक कार्यक्रमावर शासनाने निर्बंध घातले आहेत.

हेही वाचा - नांदेड : दिव्यांगासाठी भाजप मदतीला, साहित्य वाटप -

जावयाला यंदा सासरवाडीत धोंडे खाण्याची संधी हुकते

यात सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे. कोरोनाशी लढा सुरू असतानाच अतिवृष्टीने जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्हा वासियांना तिहेरी संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या तिन्ही संकटामुळे यंदा नवविवाहित जोडपे धोंड्याला मुकणार आहेत. जावयाला यंदा सासरवाडीत धोंडे खाण्याची संधी मिळते की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. अधिक मासानिमित्त दर तीन वर्षांनी अनेक शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु कोरोना महामारीमुळे यंदा यावरही विरजण पडले आहे. नवविवाहीत जोडप्यांना विशेषता जावयाला मिष्ठान्न भोजन, नवीन कपडे, सुवर्णमुद्रा, चांदीच्या वस्तू, इतर भेटवस्तू देण्याची प्रथा असते. धोंड्याचा महिना सुरू होऊन आठ दिवस लोटले तरी बाजारात म्हणावी तशी धामधूम दिसून येत नाही. 

येथे क्लिक करानांदेड : पत्नीचा खून करून पतीकडून आत्महत्येचा प्रयत्न

चैत्र ते अश्विन या महिन्यांमध्ये अधिक मास येतो

यंदा कोरोनाचे वाढते रुग्ण व संख्या लक्षात घेता धोंड्याच्या जेवणाचा आग्रह किंवा निमंत्रणाचे प्रमाणही कमी झाले. चैत्रपासून फाल्गुनपर्यंत बारा महिन्यात ३५५ दिवसात आणि इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे नक्षत्राप्रमाणे सर्व वर्षाचे दिवस ३६५असतात. हे दहा दिवस तीन वर्षांनी तिस दिवस झाल्यावर एक महिना अधिक ते पुन्हा सारखेच होतात. म्हणजे तीस दिवसांनी अधिक मास येतो. चैत्र ते अश्विन या महिन्यांमध्ये अधिक मास येतो. मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यात अधिक मास येत नाही. पण फाल्गुनात देऊ शकतो. गरीब व गरजूंना मदत मिळावी म्हणूनही अनेकजण अधिक मासात दानधर्म करतात. ३३ अनारसे, दीपदान केले जातात. आधुनिक काळात अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, रक्तदान, श्रमदान, अर्थदान आणि ग्रंथदान करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.