नांदेड : दिव्यांगासाठी भाजप मदतीला, साहित्य वाटप

प्रल्हाद कांबळे
Friday, 25 September 2020

दहावी व बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विधार्थ्याना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव भाजापाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

नांदेड - भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या सौजन्य सप्ताह राबविला जात आहे. त्याच अनुषंगाने देगलूर येथे दिव्यांग व्यक्तींना लागणारे साहित्याचे वाटप करण्यात आले. दहावी व बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विधार्थ्याना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव भाजापाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

भाजपाच्या सेवा सप्ताह दिनानिमित्त तालूका व शहर भाजपाच्या वतीने शहरातील गोविंद माधव मंगलकार्यालयात गुरुवारी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपचे जिल्हासरचिटणीस माधवराव पाटील उच्चेकर, श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर, आध्यात्मिक आघाडीचे राज्य समन्वयक राजेश महाराज देगलूरकर, जिल्हा चिटणीस शिवकुमार देवाडे, तालुकाध्यक्ष शिवाजी कनकंटे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पबीतवार, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज देशमुख करडखेडकर, शहराध्यक्ष अशोक गंदपवार, नगरसेवक प्रशांत दासरवाड आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती.

हेही वाचानांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर

दिव्यांगाला मदतीचा हात

तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना वॉकर, काठी व चश्म्याचे वाटप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व इतर जिल्हास्तरीय भाजपा पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विधार्थ्याना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यांची होती उपस्थिती 

अध्यात्मिक आघाडीच्या राज्य समन्वयकपदी राजेश महाराज देगलूरकर यांची निवड करण्यात आल्याने त्यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपाचे शहरसरचिटणीस  कृष्णा जोशी, गंगाधर दाऊलवार, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक डुकरे, शिवाजी इंगळे, सुरज मामीडवार, मल्लिकार्जुन पाटील, शिवराज हांडे, किशन पांचाळ, मारोती पुलचवाड, अ‍ॅड श्रीकांत कोम्पले, कैलाश वंटे, शिवकांत धडेले, बालाजी पाटील थोटवाडीकर, गंगाधर दोसलवार, बाबू भंडरवार आदिसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: BJP to help the disabled, distribution of materials nanded news