esakal | अखेर देगलूर तालुक्याला कोरोनाचा पहिला ‘धक्का’
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

खबरदारी म्हणून देगलूर शहरासह तालुक्यात सतर्कतेचे आदेश सर्व विभागांना प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. प्रत्येक गाव स्तरावरील शासकीय कर्मचारी व संबंधित विभागाचे प्रमुख यांनी तेथील नागरिकांशी संपर्क ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, बाधित पॉझिटिव्ह महिला रुग्णास मुखेड येथील कोविड रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. आमदापूर येथील गावकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासूनच सतर्कता बाळगायला सुरवात केली होती. पुन्हा बुधवारी (ता. तीन) महिलेचा अहवाल प्राप्त होताच गावात प्रमुख मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत.

अखेर देगलूर तालुक्याला कोरोनाचा पहिला ‘धक्का’

sakal_logo
By
अनिल कदम

देगलूर, (जि. नांदेड) ः भेंडेगाव तालुका मुखेड येथील एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने वास्तव्य केलेल्या हमदापूर तालुका देगलूर येथील त्याचे सासू-सासरे व इतर तीन जणांना व सहप्रवासी राहिलेल्या अंतापूर येथील चार जणांना प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच ‘आयटीआय’मध्ये क्वांरनटाइन केले होते. बुधवारी (ता.तीन) आमदापूर येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने आमदापूर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले असून पूर्ण गाव सील केले आहे.

प्रमुख मार्गावर बॅरिकेट्स
खबरदारी म्हणून देगलूर शहरासह तालुक्यात सतर्कतेचे आदेश सर्व विभागांना प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. प्रत्येक गाव स्तरावरील शासकीय कर्मचारी व संबंधित विभागाचे प्रमुख यांनी तेथील नागरिकांशी संपर्क ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, बाधित पॉझिटिव्ह महिला रुग्णास मुखेड येथील कोविड रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. आमदापूर येथील गावकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासूनच सतर्कता बाळगायला सुरवात केली होती. पुन्हा बुधवारी (ता. तीन) महिलेचा अहवाल प्राप्त होताच गावात प्रमुख मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत.

हेही वाचा -  हिंगोलीत भुईमुगाच्या चार हजार पोत्यांची आवक -
 
गुरुवारपासून (ता. चार) गावात दोन आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन पुढील १४ दिवस सर्वेक्षण केले जाणार आहे व दररोज गावात निर्जंतुकीकरणची फवारणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली. गावकऱ्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून त्यांना गावस्तरावर धान्य, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली आहे.

मोटारसायकलस्वार, ऑटोचालक अद्याप फरारच
भेंडेगाव (ता. मुखेड) येथील बाधित रुग्णाला मोटारसायकलवरून आमदापूर येथे आणणारा युवक व अंतापूर येथील त्या चार जणांसह बाधित रुग्णांची प्रवासी वाहतूक करणारा ऑटोचालक, असे दोन जण वाहक ठरण्याची शक्यता असून ते सध्या फरार असले तरी त्यांना ताब्यात घेऊन क्वांरटाइन करण्याचे मोठे काम प्रशासनाला यापुढे करावे लागेल.

loading image