esakal | धक्कादायक : नांदेडात ‘कोरोना’चा चौथा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

बुधवारी (ता. सहा) ३२ अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी २३ जणांचे अहवाल संध्याकाळी प्राप्त झाले. त्यापैकी २२ जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह तर अबचलनगर येथील ५६ वर्षाच्या व्यक्तीचा संध्याकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि संध्याकाळी काही तासाच्या आतच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

धक्कादायक : नांदेडात ‘कोरोना’चा चौथा बळी

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : मागील दोन दिवसापासून नांदेडला कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. मात्र, दुसरीकडे तीन दिवसापूर्वी विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या अबचलनगरच्या ५६ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी (ता. सहा) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि काही तासातच संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात चौथ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

बुधवारी (ता. सहा) ३२ अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी २३ जणांचे अहवाल संध्याकाळी प्राप्त झाले. त्यापैकी २२ जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह तर अबचलनगर येथील ५६ वर्षाच्या व्यक्तीचा संध्याकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि संध्याकाळी काही तासाच्या आतच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अबचलनगरच्या या व्यक्तीस रविवारी (ता. तीन) एनआरआय यात्री निवास येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

हेही वाचा- ‘त्या’ चार पॉझिटीव्ह रुग्णांवर गुन्हा दाखल

रिपोर्ट आला अन रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला

अबचलनगरच्या ५६ वर्षीय रुग्णास अतिउच्च रक्तदाब आणि ह्रदयरोग आजार असल्याने बुधवारी (ता. सहा) सकाळी नऊच्या दरम्यान अतीगंभीर अवस्थेत श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु औषधोपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने त्यास पुन्हा संध्याकाळी तातडीने विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात घेऊन जात असतानचा रुग्णालयात पोहण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा- Video : नृत्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीत काय आहे महत्त्व?, ते वाचाच

आत्तापर्यंत चौघांचा बळी

यापूर्वी पीरबुऱ्हाण येथील जिल्ह्यात पहिल्या ६४ वर्षीय व्यक्तीस ता. २२ एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्याचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला असताना त्याचा ‘कोरोना’ आजाराने जिल्ह्यातील पहिला बळी गेला. तर परभणीच्या सेलू तालुक्यातील अनेक व्याधी असलेल्या एक महिलेचा ‘कोरोना’मुळे उपारादरम्यान मृत्यू झाला आहे. देगलूरनाका परिसरातील रहेमत नगर येथील एका ४८ वर्षीय महिलेवर खासगी रुग्णालयात ‘सारी’ आजारावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान महिलेची ‘स्वॅब’ चाचणी घेण्यात आली होती. रविवारी (ता. तीन) सकाळी ‘कोरोना’ आजाराचे निदान झाले आणि काही तासातच दुपारी त्याच दिवशी या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीताचा आकडा ३५ वर पोहचला आहे. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून ३१ कोरोना बाधीत रुग्णावर उपचार सुरु आहेत.