esakal | जिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक; शनिवारी ५९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, चार बाधितांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

शनिवारी प्राप्त झालेल्या ५९१ अहवालाने सर्व संकट समोर उभे टाकले आहे. शुक्रवारी (ता.१२) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शनिवारी (ता.१३) तीन हजार १२३ पैकी दोन हजार ५०२ निगेटिव्ह, ५९१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २६ हजार ३९१ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक; शनिवारी ५९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, चार बाधितांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - नवीन वर्ष सुरु झाले. २६ जानेवारीच्या मुहूर्तावार लॉकडाउनमध्ये सुट दिली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आज ना उद्या सुधारेल असे अनेकांना वाटत होते. दरम्यान नांदेडकरांनी देखील तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे व समांतर अंतर बाळगणे जणू सोडुनच दिले होते. त्याचा विपरीत परिणाम मार्च महिण्यात दिसून येत आहे. शनिवारी (ता.१३) जिल्ह्यात सर्वाधित ५९१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर चार बाधितांचा मृत्यू देखील झाला आहे. 

शुक्रवारी अचानक ३६० रुग्ण वाढल्याने ही नवीन वर्षातील सर्वोच्च नोंद असेल असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु शनिवारी प्राप्त झालेल्या ५९१ अहवालाने सर्व संकट समोर उभे टाकले आहे. शुक्रवारी (ता.१२) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शनिवारी (ता.१३) तीन हजार १२३ पैकी दोन हजार ५०२ निगेटिव्ह, ५९१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २६ हजार ३९१ इतकी झाली आहे. अरविंदनगर नांदेड येथील महिला (वय ५८), सनमित्रनगर नांदेड महिला (वय ८९) यांच्यावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात तर शिवाजीनगर नांदेड पुरुष (वय ७६), कलामंदीर नांदेड पुरुष (वय ५५) या दोन पुरुषांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना वरील चौघांचा शनिवारी मृत्यू झाला. 

हेही वाचा- सव्वा तीनशे एकरवर तुतीची नोंदणी; जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या संकल्पनेतून रेशीम उद्योगाला चालना

४९ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर 

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ६१४ इतकी झाली आहे. शनिवारी १७४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत २३ हजार ५३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या दोन हजार २६ बाधितांवर उपचार सुरु असून, त्यापैकी ४९ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

हेही वाचा- भाजपमुळे लोकशाही व देश धोक्यात- डाॅ प्रा. यशपाल भिंगे

जिल्हाभरात इथे आढळले रुग्ण 

शनिवारी नांदेड महापालिकेंतर्गत ४७३, नांदेड ग्रामीण - २२, हदगाव - चार, मुखेड - नऊ, लोहा - २४, मुदखेड - एक, धर्माबाद -सात, नायगाव - दोन, बिलोली - एक, किनवट - १८, माहूर - नऊ, भोकर - एक, अर्धापूर - चार, देगलूर - सहा, कंधार - तीन,उमरी - एक, हिंगोली- दोन, परभणी- एक, यवतमाळ - एक, लातूर -एक, नागपूर - एक असे ५९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

कोरोना मीटर ः 

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २६ हजार ३९१ 
एकूण कोरोनामुक्त - २३ हजार ५३४ 
एकूण मृत्यू - ६१४ 
शनिवारी पॉझिटिव्ह - ५९१ 
शनिवारी कोरोनामुक्त -१७४ 
शनिवारी मृत्यू - चार 
उपचार सुरु - दोन हजार २६ 
गंभीर रुग्ण - ४९ 
स्वॅब प्रलंबित - ४३० 
 

loading image