लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

पोलिस नाईक शाम काळे हा पाच हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अलगद अडकला.

नांदेड :  नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात व जामिनासाठी मदत करतो म्हणणारा पोलिस नाईक शाम काळे हा पाच हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अलगद अडकला. ही सापळा कारवाई वाजेगाव (ता. नांदेड) पोलिस चौकीत बुधवारी (ता. तिन) सकाळी ११ वाजताच्या सुमारास केली.
 
तक्रारकर्त्याच्या भावाविरुद्ध नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात एका प्रकरणात गुन्हा दाकल करण्यात आला होता. दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करून त्याला न्यायालयातून लवकर जामिन मिळवून देतो असे म्हणून तक्रारदाराकडे पोलिस नाईक शाम अर्जून काळे (बन. २३२९) याने पाच हजाराची लाच मागितली. गुन्ह्याचा प्रकार गंभीर नसतांना पाच हजार रुपये या लॉकडाउनमध्ये कसे द्यावे हा प्रश्‍न तक्रारदाराला पडला. शेवटी त्याने पैसे देण्यास हकार दिला. मात्र मनात इच्छा नसलेल्या तक्रारदाराने मंगळवारी (ता. दोन) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात धाव घेतली. 

हेही वाचा -  लग्नात फुलांची जागा घेतली सॅनिटायझरने

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधीत पोलिस नाईक शाम काळे हा पाच हजार रुपये मागत असल्याची तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांनी आपल्या पथकाला या तक्रारीची शहानिशा करण्यास पाठविले. पोलिस निरीक्षक राहूल पखाले यांनी या तक्रार पडताळणीचा सापळा लावला. यात पाच हजार रुपये बुधवारी (ता. तिन) वाजेगाव पोलिस चौकीत घेण्याचे निष्पन्न झाले. यावरून बुधवारी सकाळीच लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने वाजेगाव पोलिस चौकी परिसरात सापळा लावला. पाच हजार रुपये घेणाऱ्या पोलिस शिपाई शाम काळे याला रंगेहात पकडले. राहूल पखाले यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा कारवाईत यांचा होता सहभाग 

सदरची सापळा कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर,अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहूल पखाले, कर्मचारी बालाजी तेलंग, हनुमंत बोरकर, गणेश तालकोकुलवार, सचीन गायकवाड, नरेंद्र बोडके यांनी पार पाडली. 

येथे क्लिक करा - नांदेडमध्ये दोन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या गेली १५४ वर

नागरिकांना आवाहान

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी हे शासकिय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडिओ, आॅडीओ क्लीप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकिय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर टोलफ्री हेल्पलाईन- १०६४ किंवा ०२४६२- २५३५१२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांनी केले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corrupt police caught in ACB's trap nanded news