esakal | लग्नात फुलांची जागा घेतली सॅनिटायझरने
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

पाहूण्यांचे स्वागत सुवासीक असलेल्या फुलांनी केल्या जात होते. मात्र ती जागा आता सॅनिटायझरने घेतल्याचे दिसून येत आहे. फुल नको सॅनिटायझर द्या असा आग्रह पाहूणे मंडळीही करत आहेत.

लग्नात फुलांची जागा घेतली सॅनिटायझरने

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सनई- सुरांचा व बँडबाजाचा आवाज न करता अतिशय साध्या पद्धतीने लग्न सोहळे पार पडत आहेत. पाहूण्यांचे स्वागत सुवासीक असलेल्या फुलांनी केल्या जात होते. मात्र ती जागा आता सॅनिटायझरने घेतल्याचे दिसून येत आहे. फुल नको सॅनिटायझर द्या असा आग्रह पाहूणे मंडळीही करत आहेत. ही किमया केली कोरोना या गंभीर आजाराने. संबंध जगाला आपल्या कवेत घेतलेल्या या आजाराचा परिणाम सर्वच क्षेत्रावर पडला आहे. आयुष्याची कमाई करून आपल्या मुलीचे कन्यादान करतांना वडिल खर्चात कधीच माघार घेत नव्हता. मात्र नाईलाजाने आपल्या लाडक्या लेकीची पाठवण करताना त्यांच्यावर कायद्याने बंधन घातले आहे. 

बुधवारी (ता. तीन) जून सकाळी दहा वाजता शहराच्या सांगवी बु. येथील राजेश गंगाधरराव पाटील कोकाटे यांच्या भाचीचा विवाह सोहळा अत्यंत साध्या पध्दतीने शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार संपन्न झाला. नागेली (ता. मुदखेड येथील बालाजी शिंदे आणि मरळक (ता. नांदेड) येथील दूर्गा कदम यांचा विवाह संपन्न झाला. या सोहळ्यास दोन्ही परिवारातील प्रमुख पाहूणे मंडळी उपस्थित होती. 

हेही वाचानांदेड शहरातील वाहतुक सुरू, सिग्नल बंद

लग्न हे पवित्र बंधन आहे

विवाह म्हणजे पुरूष व स्त्री अशा दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मात हा संस्कार आहे. विवाह हा संतती किंवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस व उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतीने पती- पत्नीमध्ये जवळीकतेचे नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यात लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे.
 
विवाह एक धार्मिक संबंध 

विवाह एक धार्मिक संबंध आहे. प्राचीन यूनान, रोम, भारत इत्यादी सर्व सुसंस्कृत देशात विवाहाला धार्मिक बंधन तसेच कर्तव्य समजले जाते. वैदिक युगात यज्ञ करणे प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य होते. परंतु यज्ञ पत्नीशिवाय पूर्ण होत नाही असे समजले जात होते. विवाह सगळ्यांना धार्मिक दृष्टीने आवश्यक होता. पत्नी शब्दाचा अर्थच यज्ञात बरोबरीने बसणारी स्त्री आहे. श्री रामाचा अश्वमेध यज्ञ पत्नीविना पूर्ण झाला नाही. म्हणून त्यांना सीताची प्रतिमा स्थापित करावी लागली.

येथे क्लिक करा - नांदेडमध्ये दोन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या गेली १५४ वर

अशा पद्धतीनेच भविष्यात लग्न सोहळे व्हावेत

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाउन असल्याने लग्न सोहळे अत्यंत साध्या पध्दतीने पार पडत आहेत. थाटामाटात लग्न करण्याची इच्छा असतांनाही कायद्याच्या चौकटीत राहून लग्न सोहळे करावे लागत आहेत. कमी पाहूणे मंडळीत व तेही अंतर ठेवून हे पवित्र सोहळे सध्या जिल्हाभरात पार पडत आहेत. काही नागरिक तर अशा पद्धतीनेच भविष्यात लग्न सोहळे व्हावेत, जेणेकरून फुजूल खर्च टाळल्या जाईल. कारण मुलीचे वडील कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन लग्न करत असतो. त्याला अशा सोहळ्यामुळे प्रतिबंध बसु शकतो. 

लॉकडाउनचे नियम पाळा

दोन व्यक्तीमध्ये एक मीटर अंतर राखून व्यवहार करा, आपली थुंकी हवेत उडू देऊ नका, रस्त्यात किंवा सार्वजनीक ठिकाणी थुंकू नका, मास्क व सॅनिटायझर नियमीत वापरा तसेच स्थानिक प्रशासनाकडून घालून दिलेल्या सगळ्या नियम व कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे.