esakal | Corona Updates : नांदेडला दिलासा! आठ जण कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

Corona Updates : नांदेडला दिलासा! आठ जण कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यातील (Nanded) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांचे प्रमाण ९६.९७ टक्क्यांवर येऊन स्थिरावले आहे. दिवसभरात ज्या प्रमाणात रुग्ण कोरोना आजारातून मुक्त होताहेत. त्याच्या कमी अधिक प्रमाण कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सोमवारी (ता.१९) आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे ११ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या ९२४ अहवालांपैकी ९०४ निगेटिव्ह, आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९० हजार १२४ इतकी झाली आहे. त्यापैकी आजघडीला ८७ हजार ३९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (covid cases decline in nanded glp 88)

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांपैकी मागील आठवडाभरापासून एकही मृत्यू झाला नसल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या दोन हजार ६५८ वर स्थिर आहे. सोमवारी नांदेड-वाघाळा महापालिका क्षेत्रात - तीन, नांदेड ग्रामीण- तीन, हिंगोली (Hingoli)- एक व मुंबई (Mumbai) -एक असे आठ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ७१ बाधितांवर औषधोपचार सुरु असून, त्यापैकी तीन बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

loading image