esakal | महावितरणच्या नांदेड परिमंडळात कोव्हिड गृह विलगीकरण कक्ष

बोलून बातमी शोधा

महावितरण गृहविलगीकरण कक्ष
महावितरणच्या नांदेड परिमंडळात कोव्हिड गृह विलगीकरण कक्ष
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महावितरण, नांदेड परिमंडळ कार्यालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यास व राहत्या घरी गृह- विलगीकरणाची सोय नसल्यास अशा कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी वसाहत, जंगमवाडी रोड, नांदेड येथील वापरात नसलेल्या निवासी गाळ्यांमध्ये स्वतंत्र गृह- विलगीकरण कक्षाची नुकतीच स्थापना करण्यात आहे.

सदर कक्षामध्ये खालील ऑक्सिमीटर टेम्प्रेचरगण, गरम पाणी केटल, वाफ घेण्यासाठी स्टिमर आदी सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना ! नांदेड जिल्ह्यातील 'या' गावाचा दलित समाजावर बहिष्कार; किराणा सामान, दूध आणि औषधंही बंद

ता. एक मे रोजी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या हस्ते गृह विलगिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. यावेळी अधिक्षक अभियंता मोहन गोपुलवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, महेंद्र बागुल, वरिष्ठ व्यवस्थापक (मा. सं) सुदर्शन कालेवाड, अतिकार्यकारी अभियंता, कनिष्ठ विधी अधिकारी पाटील, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता (स्था) आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या कर्मचाऱ्यांकरीता कक्ष खुला करण्यात आला आहे. सदर गृह विलागरकरण कक्षाचा लाभ घ्यावयाचा असल्यास 7875764637, 9673480777, 9860121322 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.