स्थावर मिळकतीच्या दरात दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढ, क्रेडाई दरवाढीच्या पुनर्विचारासाठी शासनाला विनंती करणार 

शिवचरण वावळे
Sunday, 13 September 2020

स्थावर मिळकतीचे दर वाढलेले दिसत आहेत. त्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये रहिवासी सदनिकांच्या दरांमध्ये पाच ते नऊ टक्के इतकी वाढ केलेली दिसून येत आहे. यात नांदेड जिल्ह्यात देखील सरासरी २०.२० इतकी वार्षिक मूल्य दरनिश्‍चित करण्यात आला आहे. 

नांदेड - महाराष्ट्र शासनातर्फे २०२०-२१ या कालावधीकरिता वार्षिक मूल्यदर तक्ता (रेडीरेकनर) नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. वास्तविक सध्याची व्यवसायाची परिस्थिती पाहता शासनाने रेडीरेकनरचे दर कमी करणे अपेक्षित होते. परंतु एकंदरीत या दरपुस्तकाचा आढावा घेतला असता बऱ्याच ठिकाणी स्थावर मिळकतीचे दर वाढलेले दिसत आहेत. त्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये रहिवासी सदनिकांच्या दरांमध्ये पाच ते नऊ टक्के इतकी वाढ केलेली दिसून येत आहे. यात नांदेड जिल्ह्यात देखील सरासरी २०.२० इतकी वार्षिक मूल्य दरनिश्‍चित करण्यात आला आहे. 

बांधकामाच्या दरामध्ये जवळपास दहा टक्के इतकी वाढ केली असून, त्यामुळे शासनाला, महानगरपालिकांना भरावयाचे विविध प्रीमियम, सेस यामधून मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा मानस दिसून येत असल्याचा आरोप देखील क्रेडाईच्या वतीने करण्यात आला आहे. जमिनीच्या दरांमध्ये काही शहरांमध्ये दर कमी केलेत तर काही ठिकाणी दर वाढविले गेले आहेत. व्यापारी, दुकानगाळे व ऑफिस दर थोड्या प्रमाणात कमी केले आहेत. 

हेही वाचा- ऐकावे ते नवलच ! नांदेडकर करतात दिवसाला पाच ट्रक अंडे फस्त ​

दरवाढीचा पुनर्विचारासाठी क्रेडाई शासनाला विनंती करणार 

शासनाने एका बाजूला स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत देऊन घर घेणाऱ्या ग्राहकाला दिलासा दिला होता, तर दुसऱ्या बाजूला रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ केलली आहे. ही बाब अन्यायकारक व बांधकाम व्यावसायिकांना अडचणीत आणणारी आहे. त्यामुळे क्रेडाई महाराष्ट्रतर्फे रेडीरेकनरच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्यास शासनाला विनंती करणार आहोत. असे बांधकाम व्यावसायिक अभिजित रेणापूरकर यांनी सांगितले आहे. 
महाराष्ट्रात रेडीरेकनरच्या दरात सरासरी वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचले पाहिजे- नांदेड : जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, कसा तो वाचा? ​

महसुलात - दस्तनोंदणीत ६० ते ४० टक्के घट

ग्रामीण भागात ३.५० टक्के, प्रभाव क्षेत्रात २.४१ टक्के, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात दोन टक्के वाढ आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रात शून्य ते ९० टक्के वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी वाढ ही २.२० टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळात महसुलात ६० टक्के घट झाली आहे. तर दस्तनोंदणीत ४० टक्के घट झाली आहे. रेडीरेकनरच्या दरवाढीमुळे नांदेड वाघाळा महापालिकेअंतर्गत येणाऱ्या व नव्याने विकसित होत असलेल्या नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर या भागात घर घेण्याचे स्वप्न बघणाऱ्या ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार हे निश्‍चित आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CREDAI urges govt to reconsider real estate price hike Nanded News