ऐकावे ते नवलच ! नांदेडकर करतात दिवसाला पाच ट्रक अंडे फस्त

शिवचरण वावळे
Saturday, 12 September 2020

कोरोना बाधितच नव्हे तर, सामान्य व्यक्तीच्या शरिरात ‘युमीनिटी पावर स्ट्रॉग’ असणे तितकेच गरजेचे असल्याचे काही दिवसातच सिद्ध झाले. आणि दूध, मटन, अंडी, आयुष काढा, दही, पनीर, मोडाची मटकी असे अ, ब, क आणि ड जिवनसत्व असलेल्या कडधान्य, फळभाज्या खाणे गरजेचे आहे. असे ‘डब्लुएचओ’ कडून सांगेपर्यंत खूप उशिर झाला होता. हजारो - लाखो जिवंत कोंडब्या तोपर्यंत खड्यात गाडल्या गेल्या

नांदेड ः देशात अचानक कोरोनाची लाट उसळ्याने कोरोना आजाराबद्दल अनेक गैरसमज पसरविले गेले. नेहमीप्रमाणे चिकन खाल्याने कोरोना होतो अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि राज्यातील पोल्ट्रीफार्म मालकांनी जेसिबिने खडा खोदून जिवंत कोंबड्या नष्ट करणे भाग पाडले. चुकीच्या अफवेमुळे पोल्ट्रीफार्म मालकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. 

खऱ्या अर्थाने सोन्याचे भाव 
कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी कोरोना बाधितच नव्हे तर, सामान्य व्यक्तीच्या शरिरात ‘युमीनिटी पावर स्ट्रॉग’ असणे तितकेच गरजेचे असल्याचे काही दिवसातच सिद्ध झाले. आणि दूध, मटन, अंडी, आयुष काढा, दही, पनीर, मोडाची मटकी असे अ, ब, क आणि ड जिवनसत्व असलेल्या कडधान्य, फळभाज्या खाणे गरजेचे आहे. असे ‘डब्लुएचओ’ कडून सांगेपर्यंत खूप उशिर झाला होता. हजारो - लाखो जिवंत कोंडब्या तोपर्यंत खड्यात गाडल्या गेल्या होत्या. परंतू या दरम्यान ज्या पोल्ट्री फार्म मालकांनी लॉकडाउनच्या काळात देखील कोंबड्यांना सांभळले त्याच कोंबड्यांच्या अंड्याला आज खऱ्या अर्थाने सोन्याचे भाव आले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

हेही वाचा- आरेच्च नांदेडात पुरुष नसबंदीचा आकडा शोधून सापडेना, महिलांनाच घ्यावा लागतो नसबंदीसाठीही पुढाकार ​

अंडे खाण्यावर भर

लॉकडाऊन दरम्यान लोक अंडी खाण्यासाठी फारसे धजावत नव्हते मात्र, तीन दिवसांपूर्वी एक डझन अंड्यांचे दर ६० रुपये इतके होते. आता एक डझन अंड्यांसाठी ८४ रुपये मोजावे लागत आहेत. लॉकडाऊन संपताच मटन, चिकनच्या बरोबरीत एक डझन अंड्यांचे दर एक-दोन नव्हे चक्क २४ रुपयांनी महागले आहेत. तर तीस अंड्याचे (एक कॅरेट)चा दर सुद्धा १८० इतका झाला आहे. दर वाढले तरी मटन- चिकन प्रमाणेच खवय्ये अंडे खाण्यावर भर देत आहेत. सध्या राज्यात फार कमी ठिकाणी पोल्ट्री फार्म असल्याने आंध्रप्रदेश व तेलंगणातून दिवसाला पाच ट्रक अंडी येत आहेत. साधारण अंडी विक्रेता एका दिवशी दिडशे ते २०० कॅरेट विक्री करतो. 

हेही वाचा- सोनेतारणावर फायनान्स कंपनीकडून ९० टक्के कर्ज नाही ​

अनेक कुटुंबाने उदर्निवाह चालवला 

अंड्यातून मानवाच्या शरिराला उर्जा देणारे घटक मिलतात. त्यामुळे एका व्यक्तीस वर्षभरात किमान १८० अंडी खाणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते. अर्थात महिण्याला किमान १५ अंडी खाणे गरजेचे आहे. यातून प्रथिने, लोह, विविध जिवनसत्वे, आयोडीन, झिंक, अशी पोषण मुल्य अंड्यातून मिळतात. आॅक्टोबर महिण्याचा दुसरा शुक्रवार हा जागतीक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. असे अशा या बहुगुणधर्मिय अंड्याचे महत्व लोकांना अधिकपणे कळू लागल्याने सध्या अंड्यांना प्रचंड मागणी सुरू आहे. त्याप्रमाणात अंड्यांचे उत्पादन नसल्याने अंड्यांचे दर वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते. लॉकडाउनमध्ये अंडी विकून अनेक कुटुंबाने उदर्निवाह चालवला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It's new to hear! Nandedkar makes five truckloads of eggs a day Nanded News