पावसाने ओढ दिल्याने पिके व्हेंटीलेटरवर, जमिनीला पडल्या भेगा

अर्धापूरता (जि.नांदेड) : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपांच्या पिकांची अवस्था नाजुक झाली असून जमिनीला भेगा पडल्या आहेत.
अर्धापूरता (जि.नांदेड) : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपांच्या पिकांची अवस्था नाजुक झाली असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. सकाळ

अर्धापूरता (जि.नांदेड) : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपांच्या पिकांची (Kharip Crops) अवस्था नाजुक झाली असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. वातावरणात उष्णता वाढल्याने पिके माना टाकत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, असे शेतकरी तुषार, ठिबक सिंचनाने (Irrigation) पिकांना पाणी देऊन ती वाचविण्यासाठी प्रयत्न करित आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास खरिपांच्या पिकांवर परिणाम होवून उत्पादन कमी होण्याची (Nanded) शक्यता आहे. तर श्रावण सरी न पडता अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. पावसाळ्यात  उन्हाळा अनुभवावा लागत आहे. यंदाच्या हंगामात जूनमध्ये पेरण्या झाल्यावर काही ठराविक अंतराने पाऊस झाल्याने प्राथमिक अवस्थेत पिकांची चांगली वाढ झाली. सध्या सोयाबीनला (Soybean) फुले कापसाला फुलंपाती लागत आहेत. सध्या सर्वच पिकांना पाण्याची गरज आहे. तालुक्यात (Ardhapur) वार्षिक सरारीच्या ६० टक्के पाऊस झाला आहे.

अर्धापूरता (जि.नांदेड) : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपांच्या पिकांची अवस्था नाजुक झाली असून जमिनीला भेगा पडल्या आहेत.
पोलिस अधिकाऱ्याची दादागिरी! रिक्षाचालकाला शिवीगाळ करित मारले

पण सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. याचा परिणाम पिकांच्य वाढीवर होत आहे. तालुका यंदाच्या हंगामात सर्वाधिक पेरा सोयबीनचा असून त्या खालोखाल हळद, कापूस आदी पिकांचा आहे. सोयाबीन फुलोरा व काही भागात शेंगा लागत आहेत. अशा नाजुक परिस्थितीत पाण्याची गरज असते. नेमक्या वेळी पाऊस रूसल्याने पिके व्हेंटिलेटरवर गेली आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. साधारणपणे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत पाऊस हमखास बरसतो. ऑगस्ट सुरू होऊन आठवडा झाला आहे. तसेच श्रावण सुरू झाला आहे. श्रावण सरी बरसण्या आधीच उष्णात वाढल्याने नागरिकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. पावसाळ्यात उन्हाळा अनुभवावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com