Nanded News : कोट्यवधींचा निधी, अंगणवाड्यांची दुरवस्थाच ; ‘सीईओं’ना द्यावे लागणार लक्ष

जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होतो; परंतु या निधीचे योग्य नियोजन होत नसल्याने जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांची अजूनही दुरवस्थाच आहे. अनेक अंगणवाड्यांना स्वतःच्या जागा नाहीत की इमारती नाहीत.
Nanded News
Nanded News sakal

नांदेड : जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होतो; परंतु या निधीचे योग्य नियोजन होत नसल्याने जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांची अजूनही दुरवस्थाच आहे. अनेक अंगणवाड्यांना स्वतःच्या जागा नाहीत की इमारती नाहीत. त्यामुळे आता याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी लक्ष द्यावे आणि अंगणवाडीसंदर्भातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी अनेक गावातील गावकऱ्यांनी केली आहे.

तीन ते सहा या वयोगटांतील चिमुकल्यांसाठी अंगणवाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन हजार ७२२ अंगणवाड्या आहेत. त्याचबरोबर या अंगणवाड्यांसाठी तोकड्या मानधनावर सहा हजार सातशे अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस कार्यरत आहेत. बालकांना पूर्व शिक्षण देण्यासोबतच गर्भवती माता, किशोरवयीन मुली यांची काळजी घेण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. मात्र, असे असले तरी आज घडीलाही जिल्ह्यातील बाराशेहून अधिक अंगणवाड्या उघड्यावर आणि दुसऱ्यांच्या जागेत भरत असल्याचे वास्तव चित्र आहे.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामासाठी वेगवेगळ्या संकेतांक क्रमांकाखाली शासनाने अंगणवाडी बांधकामासाठी निधी दिला आहे. यात पहिल्या टप्प्‍यात पाच कोटी ४५ लाख ८५ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी २५ लाख रुपये तर नव्याने संकेतांक क्रमांकाखाली हेड निर्माण करत ६३ लाख ६३ हजार रुपयांचा असा एकूण नऊ कोटी ३४ लाख ४८ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. याशिवाय ‘लेक लाडकी’ या योजनेसाठी ५० लाख रुपये, डुल डेस्क व साहित्य पुरवठा करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी आला आहे. मात्र, त्याचा खर्चाचे नियोजन प्रत्यक्षात करण्यासाठी काय प्रयत्न झाले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com