file photo
file photo

नायगाव शहरात दिवसाढवळ्या घरफोडी; साडेचार लाखाचा ऐवज केला लंपास

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : घरातील सदस्य शाल अंगठीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लग्नासाठी खरेदी केलेले पाच तोळ्याचे दागिने व नगदी दोन लाख अशी साडेचार लाखाची रक्कम दिवसाढवळ्या पळवल्याची घटना रविवारी (ता. २८) रोजी नायगाव येथे घडली. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

येथील एरिगेशन काँलनीमध्ये राहणारे शिक्षक जोगेंद्रसिंह नंदूसिंह ठाकूर यांचा रविवारी (ता. २८) फेब्रुवारी रोजी शाल आंगठीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी घरातील सर्व सदस्य घराला कूलूप लावून शाल आंगठी असलेल्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रम संपल्यावर घरी परत आले असता मागचे दार तोडून कुणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व कपाटातील पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व नगदी दोन लाख रुपये असा साडेचार लाखाचा ऐवज पळवल्याची घटना घडली. 

सदर प्रकरणी जोगेंद्रसिंह ठाकूर यांनी नायगाव पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २८) रोजी सायंकाळी रोजी रितसर तक्रार दिली असून सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केले. तक्रारीनंतर श्वान पथक व ठसे तज्ञाचे पथक रात्री उशीरा आले होते पण काहीही माग काढता आला नाही. सदर प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस उप निरीक्षक श्री. बाचावार हे तपास करत आहेत. 

वधूच्या अंगावर दागिणे टाकण्यासाठी खरेदी करण्यात आलेले दागिने व दोन लाखाची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या पळवल्याने ठाकूर परिवार धास्तावला आहे. यापूर्वी झालेल्या एकाही चोरीच्या घटनेचा तपास लावण्यात नायगाव पोलीसांना तश आले नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य उंचावले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com