esakal | नांदेड जिल्ह्यात मृत्यूने गाठला आत्तापर्यंतचा उच्चांक; शनिवारी ९७० पॉझिटिव्ह, १४ बाधितांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

शुक्रवारी (ता. २६) चार हजार २७५ अहवाल प्राप्त झाले. यामधील दोन हजार ४४२ निगेटिव्ह तर ९७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ३७ हजार ५२५ इतकी झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात मृत्यूने गाठला आत्तापर्यंतचा उच्चांक; शनिवारी ९७० पॉझिटिव्ह, १४ बाधितांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून आत्तापर्यंत अतीगंभीर रुग्णांपैकी १० ते १२ पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद आढळते. मात्र, शुक्रवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीत जिल्ह्यातील गंभीर रुग्णांपैकी १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आत्तापर्यंतचा दिवसभरातील सर्वोच्च मृत्यूचा आकडा असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे संचारबंदी लागू होताच बाधितांची संख्या कमी झाल्याने त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे. 

गुरुवारी (ता. १५) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी (ता. २६) चार हजार २७५ अहवाल प्राप्त झाले. यामधील दोन हजार ४४२ निगेटिव्ह तर ९७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ३७ हजार ५२५ इतकी झाली आहे. शुक्रवारी भगवाननगर पुरुष (वय ५२), हसनल (ता. मुदखेड) पुरुष (वय ६०), अंतापूर (ता. देगलूर) पुरुष (वय ५५), कौठा नांदेड महिला (वय ४५), शिवाजी चौक लोहा महिला (वय ६०), मोंढा नांदेड पुरुष (वय ५५), दत्तनगर नांदेड महिला (वय ७०), हिवळी (ता. माहूर) पुरुष (वय ६२), विनायकनगर नांदेड पुरुष (वय ८०), इतवारा पुरुष (वय ७०), तिरुमला नगर पुरुष (वय ६८), अंबिकानगर नांदेड पुरुष (५९) व लेबर कॉलनी नांदेड महिला (वय ६१) या १४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६९७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही..!,नांदेडातील गोवर्धनघाटावर दिवसाला १९ मृतदेह, तर मसनजाळी केवळ बारा

असे आहेत पॉझिटिव्ह 

शुक्रवारी नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत - ५५१, नांदेड ग्रामीण - ४१, लोहा - ४२, कंधार - ३३, मुदखेड - १७, बिलोली- १४, हिमायतनगर - सहा, माहूर ११, उमरी - १४, देगलूर - २०, भोकर - १६, नायगाव - २१, बारड - एक, धर्माबाद - १४, अर्धापूर - १४, किनवट - ४७, मुखेड - ३०, हदगाव - ७३, लातूर - एक, हिंगोली - दोन, वाशीम - एक व मुंबई - एक असे ९७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा- नांदेडमध्ये पुरेसे बेड उपलब्ध असून रुग्णांनी घाबरून जाऊ नये - जिल्हाधिकारी डॉ. विपीन

४११ स्वॅबची तपासणी सुरु 

शुक्रवारी दिवसभरात ५५२ कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत २७ हजार ८८० बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या आठ हजार ७१५ बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यामधील ९३ बाधितांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ४११ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - ३७ हजार ५२५ 
एकुण कोरोनामुक्त - २७ हजार ८८० 
एकुण मृत्यू -६९७ 
शुक्रवारी पॉझिटिव्ह - ९७० 
शुक्रवारी कोरोनामुक्त - ५५२ 
शुक्रवारी मृत्यू - १४ 
उपचार सुरु - आठ हजार ७१५ 
गंभीर रुग्ण - ९३ 
स्वॅब प्रलंबित - ४११ 
 

loading image