जिल्ह्यातील मृत्यूची मालिका थांबेना, शनिवारी आठ रुग्णांचा मृत्यू; १४० जण पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे
Saturday, 3 October 2020

शनिवारी ६५१ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ५०१ निगेटिव्ह, १४० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार १९९ वर जाऊन पोहचली आहे.

नांदेड - मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असली, तरी जिल्ह्यातील मृत्यूची मालिका काही केल्या थांबेना अशी झाली आहे. शनिवारी (ता. तीन) प्राप्त झालेल्या अहवालात दहा दिवसांच्या उपचारानंतर १५४ रुग्ण कोरोनामुक्त, १४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, उपचारादरम्यान पाच पुरुष आणि तीन कोरोना बाधित महिलांचा मृत्यू झाला. जिल्‍ह्यातील मृत्यूचा आकडा आता ४२० इतका झाला आहे. 

शुक्रवारी (ता. दोन) तपासण्यासाठी घेण्यात आलेलेल्या स्वॅबपैकी शनिवारी ६५१ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ५०१ निगेटिव्ह, १४० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार १९९ वर जाऊन पोहचली आहे. दहा दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- १४, विष्णुपुरी शासकीय रुग्णालय- नऊ, पंजाब भवन, यात्री निवास, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमधील ४७, बिलोली- चार, भोकर- १८, हदगाव- १५, माहूर- एक, धर्माबाद -दहा, मुखेड- १७, हिमायतनगर- पाच यासह निजामाबाद- एक, खासगी रुग्णालय- १०, अकोला- एक, लातूर - एक, औरंगाबाद -एक असे १५४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजपर्यंत जिल्ह्यातील १२ हजार ५४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

हेही वाचा- Video- सुट देऊन लुट करणे खादीच्या तत्वात बसत नाही : किनगावकर ​

तीन हजार १३५ बाधित रुग्णांवर उपचार सुरू 

शुक्रवारी आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट किटद्वारे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी नांदेड वाघाळा महापालिका- ८२, नांदेड ग्रामीण- तीन, भोकर- एक, अर्धापूर- १३, बिलोली- एक, धर्माबाद- चार, देगलूर- सहा, कंधार- नऊ, मुदखेड- एक, नायगाव- दोन, माहूर-एक, लोहा- चार, किनवट- पाच, उमरी- एक, हिंगोली- तीन, यवतमाळ - एक, वाशीम - एक, औरंगाबाद- एक असे १४० रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १६ हजार १९९ वर गेला, असून १२ हजार ५४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या तीन हजार १३५ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड - हाथरस प्रकरणी मंगळवारी वंचितचे मानवी साखळी आंदोलन ​

या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु ः 

विष्णुपुरी शासकीय रुग्णालय- २१८, जिल्हा शासकीय रुग्णालय- ६६, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत- ५४, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय-१८, पंजाब भवन- यात्री निवास- महसूल भवन आणि होम क्वारंटाईन- एक हजार ८६३, नायगाव-५४, बिलोली-५६, मुखेड-८४, देगलूर- ४२, लोहा-२९ हदगाव-३५, भोकर-२७, कंधार- २१, मुदखेड-१८, माहूर-१९, किनवट- ४७, धर्माबाद- ५७, उमरी-४२, हिमायतनगर- सहा, बारड-१२, अर्धापूर-५४, खासगी रुग्णालय- ३०६, लातूर- एक, औरंगाबाद- दोन, मुंबई- दोन व आदिलाबाद येथे संदर्भीत दोन असे तीन हजार १३५ कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. 

कोरोना मीटर ः 

शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह- १४० 
शनिवारी कोरोना मुक्त- १५४ 
शनिवारी मृत्यू- आठ 
एकूण पॉझिटिव्ह- १६ हजार १९९ 
एकूण कोरोनामुक्त- १२ हजार ५४५ 
एकूण मृत्यू- ४२० 
उपचार सुरु- तीन हजार १३५ 
गंभीर रुग्ण- ३३ 
स्वॅब अहवाल प्रतिक्षा- एक हजार ३९१ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death toll in the district has not stopped with eight patients dying on Saturday 140 positive Nanded News